Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जुलै २३, २०२१

पहिली ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात | Education

 

  देशातील कोरोनाची परिस्थिती अद्याप सुधारलेली नाही. अनेक ठिकाणी लाॅकडाऊन आणि विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत शाळांनी विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे मात्र ऑनलाईन शिक्षणाला मर्यादा आहेत. त्यामुळेच गेल्या वर्षी प्रमाणे यंदादेखील शालेय अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वैश्विक महामारी च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगातील विद्यार्थ्यांना संकटाला सामोरे जावे लागत आहे . कोरोनाच्या संकटामुळे देशातील शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र सुरू आहे राज्यात देखील ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले आहे. ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादांमुळे गेल्या वर्षी अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्यात आली होती. कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे यावर्षी ही शैक्षणिक वर्ष ऑनलाईन पध्दतीने शिक्षण घेत आहे अनेक शिक्षक संघटना, मुख्याध्यापक यांनी शालेय अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्याची मागणी शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांच्याकडे केली होती राज्यात कोरोना मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र राज्य मंडळाच्या शाळेतील अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केला आहे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन तसेच शिक्षक व पालक संघटनेने केलेल्या मागणीचा विचार करून या वर्षी शैक्षणिक वर्षात शिक्षण विभागाने 25 टक्के अभ्यासक्रम कमी करून विद्यार्थ्यांचा फार मोठा दिलासा दिला आहे. सर्व संबंधित घटकांशी विचारविनिमय केल्यानंतर आणि कोरोना च्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गतवर्षीप्रमाणे शैक्षणिक वर्ष 2021 - 22 साठी इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या 25 टक्के पाठ्यक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. इ.1ली ते 12 वी या वर्गांचा 25% पाठ्यक्रम कमी | PDF

इ.1ली ते 12 वी या वर्गांचा 25% पाठ्यक्रम कमी | PDF

संबंधित शोध सेतू अभ्यासक्रम पहिली चा अभ्यासक्रम सेतू अभ्यासक्रम pdf सेतू अभ्यासक्रम दहावी सेतू अभ्यासक्रम आठवी सेतू अभ्यासक्रम इयत्ता आठवी सेतू अभ्यासक्रम pdf download सेतू अभ्यासक्रम इयत्ता सातवी कोण कोणते घटक होणार कमी ?.... इयत्ता 1 ली ते 8 वी कपात पाठ्यक्रम PDF link https://drive.google.com/file/d/19IIS... इयत्ता 9 वी व 10 वी कपात पाठ्यक्रम PDF link https://drive.google.com/file/d/19QM0... इयत्ता 11 वी ते 12 वी कपात पाठ्यक्रम PDF link https://drive.google.com/file/d/19QM0...

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.