Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, ऑगस्ट १७, २०२०

पावसामुळे गङचिरोली जिल्ह्यातील अनेक मार्ग


गडचिरोली/ प्रतिनिधी
मागील 24 तास झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्या भरून वाहत असून अनेक मार्ग बंद आहेत.
-
वैनगंगा नदी :
# नदीची पाणी पातळी पवणी व आष्टी केंद्रावरील नोंदीनुसार सामान्य असून इशारा पातळीच्या खाली आहे.
# गोसीखुर्द प्रकल्पाचे 13 गेट प्रत्येकी 0.50 मी ने उघडण्यात आलेले असून विसर्ग सामान्य आहे.

*वर्धा नदी* :
# नदीची पाणी पातळी बामणी (बल्हारशा) व सिरपूर केंद्रावरील नोंदीनूसार सामान्य असून इशारा पातळीच्या खाली आहे.

*प्राणहिता नदी :
# पाणलोट क्षेत्रातील अतिवृष्टीमुळे नदीची पाणी पातळी महागांव व टेकरा केंद्रावरील नोंदीनुसार वाढलेली असून इशारा पातळीच्या खाली आहे.

*गोदावरी नदी* :
प्राणहिता नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे प्राणहिता व गोदावरी नदीची पाणी पातळी वाढलेली असल्याने मेडीगड्डा बॅरेज चे 65 गेट (विसर्ग: 4,93,900 क्युसेक्स) उघडलेले असून विसर्ग जास्त असल्याने नदी काठावरील गावातील लोकांनी सतर्कता बाळगावी.

*इंद्रावती नदी*
# सिरोंचा व अहेरी तालूक्यात, तसेच छत्तीसगढ राज्यातील बिजापूर व दंतेवाडा जिल्हयात भरपूर ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने इंद्रावती नदीची पाणी पातळी वाढलेली असून पाथागुडम केंद्रावरील नोंदीनुसार पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे. प्राप्त अहवालानुसार जगदलपूर, चिंदनार व तुमणार येथे नदीची पाणी पातळी वाढत असल्याने जिल्हयातील इंद्रावती नदीची पाणी पातळी पून्हा वाढण्याची शक्यता आहे. कृपया नदी काठावरील गावातील लोकांनी सतर्कता बाळगावी.

*#पर्लकोटा* नदीची पाणी पातळी मानपूर (राजनांदगांव जिल्हा) केंद्रावर सामान्य आहे, इंद्रावती नदीच्या बॅक वॉटर मुळे पर्लकोटा नदीची पातळी वाढलेली असून भामरागड केंद्रावरील दुपारी 3.30 वा. च्या नोंदीनुसार पाणी पातळी पुलाच्या 0.60 मी ने वर आहे. कृपया नदी काठावरील गावातील लोकांनी सतर्कता बाळगावी.


*#वाहतूक बंद असलेले मार्ग* :-
1. आलापल्ली- भामरागड (पर्लकोटा नदी)
2. असरअली- सोमनपल्ली मार्ग (सिरोंचा) (सोमनपल्ली नाला)
3. रोमपल्ली- झिंगानूर (कोरेतोगू नाला)
4. हेमलकसा करमपल्ली सुरजागड (पिडमिली नाला)
5. कसनसूर कोठी भामरागड कवंठे (आरेवाडा नाला)

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.