Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, एप्रिल २५, २०१९

मुंबई - नागपूर महामार्गावर ट्रकची कारला धडक; तीन ठार


 औरंगाबाद-
 मुंबई - नागपूर महामार्गावर वैजापूर तालुक्यातील
दत्तवाडी येथे ट्रक आणि झायलो कारचा समोरासमोर भीषण अपघात घडला. या अपघातात
कारमधील तीन जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले आहेत. ही घटना आज सकाळी
घडली. अपघातानंतर वैजापूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारार्थ
औरंगाबादमध्ये खाजगी रुग्णालयात दाखल आले आहे. वैजापूर तालुक्यातील एकाच आठवड्यात हा
दुसरा भीषण अपघात घडला आहे. आमिर खान (वय 36 वर्षे), इर्शाद खान (वय 32 वर्षे)
हारूण खान (वय 35 वर्षे) तिघे रा. बहिरंज, मुंबई) अशी या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे
आहेत. तर शादुल खान (वय 32 वर्षे), आयुब लाल खान (वय 36 वर्षे), नुरुद्दीन खान (वय 28
वर्षे) (सर्व रा. बहिरज, मुंबई) हे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या
घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, मुंबई-नागपूर
महामार्गावरील शिवराय कॉर्नरजवळ वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथून औरंगाबादकडे भंगार
घेऊन येणार्‍या ट्रक (क्रमांक एमएच 15/बीजे 7858) व औरंगाबादकडून मुंबईकडे जाणार्‍या
झायलो कार (क्रमांक एमएच 04/जीएम 6425) ची समोरासमोर धडक झाली. हा अपघात एवढा
भीषण होता की, ट्रकच्या धडकेने झायलो कारचा पार चुराडा झाला आहे. अपघातामुळे झायलो
कार ही रस्त्याच्या कडेला जाऊन पडली. तिन्ही मृतदेह गाडीमध्ये अडकले होते. पोलिसांनी
नागरिकांच्या मदतीने गाडीचा पत्रा तोडून मृतदेह व जखमींना गाडी बाहेर काढले. अपघाताची
माहिती वैजापूर पोलिस ठाण्यात कळताच जमादार थोरात व तमनार हे घटनास्थळी दाखल
झाले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ घाटी रुग्णालयात हलवले. अपघातामुळे
मुंबई-नागपूर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.