Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, एप्रिल २५, २०१९

17 मतदारसंघात 33 हजार 314 मतदान केंद्र 3 कोटी 12 लाख मतदार

लोकसभा निवडणूक मतदानाचा शेवटचा टप्पा :

मुंबईदि. 25 : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यामध्ये 29 एप्रिल रोजी राज्यातील 17 मतदारसंघामध्ये मतदान होत आहे. 3 कोटी 11 लाख92 हजार 823 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. त्यात 1 कोटी 66 लाख 31 हजार पुरुष तर 1 कोटी 45 लाख 59 हजार महिला मतदार आहेत. मुंबई उत्तर मतदारसंघात सर्वाधिक 332 तृतीयपंथी मतदार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.
या लोकसभा मतदारसंघांमध्ये 102 विधानसभा मतदारसंघ असून 33 हजार 314 मतदान केंद्र आहेत.  सुमारे 1 लाख 7 हजार 995 ईव्हीएम (बीयू आणि सीयू) तर 43 हजार 309 व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात आले आहेत.
            राज्यात आतापर्यंत एकूण तीन टप्प्यांमध्ये 31 मतदारसंघांमध्ये मतदान शांततेत पार पडले. शेवटच्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी तयारी सुरु आहे. मतदान केंद्रांवर आवश्यक असणाऱ्या सुविधांबाबत निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत. 'सखीमतदार केंद्रदिव्यांग मतदारांसाठी व्हील चेअरपिण्याच्या पाण्याची सुविधासावलीसाठी मंडप अशा सोयी यापुर्वी झालेल्या मतदान प्रक्रियेत पुरविण्यात आल्या आहेत.
            नंदुरबार (अ.ज.)धुळेदिंडोरी (अ.ज.),नाशिकपालघर (अ.ज.)भिवंडीकल्याणठाणेमुंबई उत्तरमुंबई उत्तर-पश्चिममुंबई उत्तर-पूर्वमुंबई उत्तर-मध्यमुंबई दक्षिण-मध्यमुंबई दक्षिण,मावळशिरुर आणि शिर्डी (अ.जा.) या लोकसभा मतदारसंघत मतदान होणार आहे.
मतदारसंघनिहाय मतदार आणि मतदान केंद्रांची संख्या :
  • नंदुरबार- 18 लाख 70 हजार 117 ( पुरुष-9 लाख 43 हजार 745, महिला- 9 लाख 26 हजार 350), (मतदान केंद्र-2115) ;
  • धुळे- 19 लाख 4 हजार 859 (पुरुष-9 लाख 93 हजार 903, महिला-9 लाख 10 हजार 935), (मतदान केंद्र-1940) ;
  • दिंडोरी- 17 लाख 28 हजार 651 (पुरुष- 9 लाख 1 हजार 82, महिला-8 लाख 27 हजार 555), (मतदान केंद्र-1884) ;
  • नाशिक18 लाख 82 हजार 46 (पुरुष- 9 लाख 88 हजार 892, महिला- 8 लाख 93 हजार 139), (मतदान केंद्र-1907) ;
  • पालघर18 लाख 85 हजार 297(पुरुष- 9 लाख 89 हजारमहिला- 8 लाख 96 हजार 178), (मतदान केंद्र-2170) ;
  • भिवंडी-  18 लाख 89 हजार 788 (पुरुष- 10 लाख 37 हजार 752, महिला- 8 लाख 51 हजार 921), (मतदान केंद्र-2200) ;
  • कल्याण19 लाख 65 हजार 131 (पुरुष- 10 लाख 61 हजार 386, महिला 9 लाख 3 हजार 473), (मतदान केंद्र-2063) ;
  • ठाणे23 लाख 70 हजार 276 (पुरुष- 12 लाख 93 हजार 379, महिला-10 लाख 76 हजार 834), (मतदान केंद्र-2452) ;
  • मुंबई उत्तर16 लाख 47 हजार 208 (पुरुष- 8 लाख 90 हजारमहिला - 7 लाख 56 हजार 847), (मतदान केंद्र- 1715) ;
  • मुंबई उत्तर-पश्चिम17 लाख 32 हजार (पुरुष- 9 लाख 50 हजार 302, महिला- 7 लाख 81 हजार 765), (मतदान केंद्र-1766) ;
  • मुंबई उत्तर-पूर्व15 लाख 88 हजार 331 (पुरुष- 8 लाख 64 हजार 646, महिला- 7 लाख 23 हजार 542), (मतदान केंद्र-1721) ;
  • मुंबई उत्तर-मध्य16 लाख 79 हजार 732 (पुरुष-9 लाख 16 हजार 627 महिला- 7 लाख 63 हजार), (मतदान केंद्र-1721);
  • मुंबई दक्षिण-मध्य14 लाख 40 हजार 142  (पुरुष- 7 लाख 77 हजार 714, महिला- 6 लाख 62 हजार 337), (मतदान केंद्र- 1572) ;
  • मुंबई दक्षिण15 हजार 53 हजार 925  (पुरुष- 8 लाख 54 हजार 121, महिला- 6 लाख 99 हजार 781), (मतदान केंद्र-1578) ;
  • मावळ22 लाख 97 हजार 405  (पुरुष- 12 लाख 2 हजार 894, महिला- 10 लाख 94 हजार 471), (मतदान केंद्र- 2504) ;
  • शिरुर21 लाख 73 हजार 527  (पुरुष- 11 लाख 44 हजार 827, महिला- 10 लाख 28 हजार 656), (मतदान केंद्र-2296);
  • शिर्डी15 लाख 84 हजार  (पुरुष- 8 लाख 21 हजार 401, महिला- 7 लाख 62 हजार 732), ( मतदान केंद्र-1710).

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.