Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

लोकसभा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
लोकसभा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, मे १३, २०२१

गंगा नदीत मृतदेह या बातमीचा फॅक्ट चेक

गंगा नदीत मृतदेह या बातमीचा फॅक्ट चेक


Old Photos of Dead Bodies Floating in Ganga Passed Off as Recent

We found that the photos, which date back to 2015, were from Uttar Pradesh’s Unnao.



गंगा नदीत कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तींचे मृतदेह आढळून आलेले आहेत, अश्या प्रकारची न्यूज, आणि सोशल मीडियावर फोटो वायरल होत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत. जे फोटो सोशल मीडियावर वायरल करत आहेत ते 2015 चे आहेत.  6 वर्षे आधी अशीच एक बातमी आलेली होती, गंगा नदीत मृतदेह सापडलेले आहेत. त्यावेळी उत्तर प्रदेश मध्ये अखिलेश यादव मुख्यमंत्री व समाजवादी पार्टीची सत्ता होती. तेंव्हाचेच फोटो आज सोशल मीडियावर वायरल करत आहेत.

हिंदू धर्मात काही समाजात अनेक वर्षांपासून मृतदेह नदीत सोडण्याची परंपरा आहे. दरवर्षी किमान हजारो मृतदेह नदीत आढळून येतात. पण, आज काही अँटी मोदी चॅनेल्स आणि द हिंदू सारखा देशद्रोही वर्तमानपत्र हे जाणीवपूर्वक लपवून या मृतदेहांना कोरोनाचे मृतदेह आहेत, हे दाखवत आहेत.

यामागे भारताची, पंतप्रधान नरेंद्रमोदी यांची बदनामी करण्याचा कटकारस्थान काही दिवसापासून कम्युनिच लोकांकडून आणि पत्रकरांकडून चाललं आहे. 2015 चे फोटो आज सोशल मीडियावर वायरल होत आहेत. त्यासंबंधीची लिंक मी कमेंट मध्ये देत आहे. जे NDTV ने बातमी केली होती. 
- प्रकाश गाडे

https://m.facebook.com/story.php?story_fbid=3990661994358049&id=100002428643311

मंगळवार, मे २१, २०१९

निकालाची माहिती जलदगतीने मिळण्यासाठी विविध सुविधा

निकालाची माहिती जलदगतीने मिळण्यासाठी विविध सुविधा



राज्यात लोकसभा निवडणूक मतमोजणीची तयारी पूर्ण

मुंबई, दि. 21 : लोकसभा निवडणूकीची मतमोजणी गुरुवार दि. 23 मे रोजी होणार असून राज्यात मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. जनतेला निकालाची माहिती जलदगतीने मिळण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.

राज्यातील 48 लोकसभेच्या जागांसाठी 23 मे 2019 रोजी फेरी पद्धतीने निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. निवडणूक निरीक्षक यांच्या देखरेखीखाली मतमोजणी होणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार राज्यात मतमोजणीची संपूर्ण तयारी झाली आहे. मतमोजणीसाठी अधिकारी आणि कर्मचारी वर्गाची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे. राज्यात मतदानासाठी प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील 5व्हीव्हीपॅट यंत्रांमधील पावत्यांची पडताळणी करण्यात येणार आहे. या अनुषंगानेही मतमोजणी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

जनतेला मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर हा निकाल पाहण्यास मिळणार आहे. तसेच 1950 या टोलफ्री क्रमांकावर आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या व 24 तास कार्यरत असलेल्या नियंत्रण कक्षातील 022-22040451 / 54 या क्रमांकावर देखील निवडणूक निकालाची अद्ययावत माहिती मिळणार आहे. मंत्रालयामध्ये माध्यम प्रतिनिधींना निवडणूक निकालाची माहिती देण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून हा नियंत्रण कक्ष देखील 24 तास कार्यरत राहणार आहे. मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण, मुख्य गेट,गार्डन गेट आणि मंत्रालयासमोरील माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या डिजिटल होर्डींगवर देखील निकालाची माहिती मिळणार आहे. याशिवाय मुंबई शहरात वाहतूक विभागाच्या डिजिटल साईन बोर्डवर देखील निकालाची माहिती देण्यात येणार आहे. मुंबईकरांना निवडणूक निकालाची माहिती जलदगतीने मिळण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत यंदा हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.

जिल्हास्तरावर जिल्हा निवडणूक अधिकारी हे जनतेला निकालाची फेरीनिहाय माहिती देणार आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

000

पालघर आणि भिवंडीमध्ये होणार सर्वाधिक 35 फेऱ्या
मुंबई, दि. 21 : लोकसभा निवडणुकांचे 23 मे रोजी निकाल येणार आहेत. महाराष्ट्रातील 48 लोकसभा जागांपैकी पालघर आणि भिवंडी मतदारसंघात सर्वाधिक म्हणजेच 35 निवडणूक निकाल फेऱ्या होतील.

पालघर आणि भिवंडी - गोंदिया आणि ठाणे मतदारसंघात एकूण 33 निवडणूक निकाल फेऱ्या तर बीड आणि शिरुर मतदारसंघात एकूण 32 निवडणूक निकाल फेऱ्या होतील. सर्वात कमी म्हणजे 17 निवडणूक निकाल फेऱ्या हातकणंगले मतदारसंघात होतील. अमरावती आणि सांगली मतदारसंघात 18 निवडणूक फेऱ्या होतील.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकूण 867 उमेदवार उभे आहेत. या निवडणुकीमध्ये राज्यभरात 97 हजार 640मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.
रामटेक व नागपूर मतदारसंघातील मतमोजणीसाठी 888 कर्मचारी

रामटेक व नागपूर मतदारसंघातील मतमोजणीसाठी 888 कर्मचारी

       
                                                                                        
Ø  प्रत्यक्ष मतमोजणीला सकाळी 8.30 वाजता होणार सुरुवात
Ø  20 टेबलवर मतमोजणी
     Ø  जिल्हा निवडणूक अधिकारी  यांनी घेतला आढावा
Ø  प्रशासन सज्ज
             नागपूर दि. 21 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीला गुरुवार दिनांक २३ मे रोजी सकाळी 8.30 वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी सकाळी 6.30 वाजता मध्यवर्ती स्ट्राँगरुममधून विविध उमेदवारांच्या उपस्थितीत ईव्हीएम मशीन्स मतमोजणीसाठी आणण्यास सुरुवात होणार आहे. मतमोजणीची व्यवस्था पूर्ण झाली असूनयासाठी 888 कर्मचारी व अधिकारी यांच्या नियुक्त करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आज दिली.
            रामटेक व नागपूर मतदारसंघातील मतमोजणी कळमना मार्केट यार्ड परिसरातील दोन हॉलमध्ये होणार आहे. मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण व्यवस्था पूर्ण करण्यात आली आहे. या व्यवस्थेचा आढावा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी प्रत्यक्ष मतमोजणी केंद्राला भेट देऊन घेतला.
            यावेळी रामटेक मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत फडकेउपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती राजलक्ष्मी शहा व संबंधित नोडल अधिकारी उपस्थित होते.
            रामटेक लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी फ्रुट ऑक्शन हॉल क्रमांक 3, तर नागपूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी फ्रुट ऑक्शन हॉल क्रमांक 4, पंडीत जवाहरलाल नेहरु कळमना मार्केट यार्ड चिखली ले- आऊटमध्ये होणार आहे.
20 टेबलनुसार होणार मतमोजणीच्या फेरी
            रामटेक लोकसभा मतदारसंघातील 2364 मतदार केंद्रावर विधानसभानिहाय मतमोजणीच्या 20 टेबलनुसार फेरी होणार असूनत्यामध्ये काटोल विधानसभा मतदारसंघातील 328 मतदान केंद्रांवरील मतमोजणीच्या 17 फेरी होणार आहेत. तर सावनेरमधील 367 मतदान केंद्रावर 19 फेरी,हिंगणामधील 436 मतदान केंद्रांवर 22, उमरेडमधील 384 मतदान केंद्रावर 20, कामठीमधील 492  मतदानकेंद्रांवर 25 आणि रामटेकमधील 357मतदान केंद्रावर 18फेऱ्यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.
             नागपूर लोकसभा मतदारसंघातील 2065 मतदार केंद्रावर विधानसभानिहाय मतमोजणीच्या 20 टेबलनुसार फेरी होणार असूनत्यामध्ये दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील 378 मतदान केंद्रांवरील मतमोजणीच्या 19 फेरी होणार आहेत. तर दक्षिणमधील 349 मतदान केंद्रावर 18फेरीपूर्वमधील 336 मतदान केंद्रांवर 17, मध्यमधील 305 मतदान केंद्रावर 16, पश्चिममधील 332 मतदानकेंद्रांवर 17 आणि उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघातील 365 मतदान केंद्रावर 19 फेऱ्यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहेअशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.
चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज


चंद्रपूर, दिनांक 21 मे: 11 एप्रिल रोजी चंद्रपूर लोकसभा मतदार संघात झालेल्या मतदानाच्या दिर्घ कालावधीनंतर मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. अतिशय कडेकोट बंदोबस्तात ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन चंद्रपूर जवळच्या वखार महामंडळाच्या गोदामामध्ये सिलबंद ठेवल्या असून 23 मे रोजी सकाळी 7 वाजता उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधीला उपस्थितीत गोदाम उघडण्यात येणार आहे. सकाळी 8 वाजता प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने निरीक्षकांची नेमणूक केली आहे. चंद्रपूरमध्ये दिपांकर सिन्हा व जे.पी.पाठक हे वरिष्ठ सनदी अधिकारी निरीक्षक म्हणून दाखल झाले आहे. ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट ठेवण्यात आलेल्या बंद गोदामाची त्याच पुढे गोदामामध्ये निर्माण करण्यात आलेली मतमोजणी यंत्रणेची निरीक्षकांनी आज पाहणी केली. जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यावेळी त्यांचे सोबत होते. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी सायंकाळी पत्रकार परिषदेला संबोधित केले.

मतमोजणी ही प्रक्रिया अतिशय कडक बंदोबस्तात वखार महामंडळातच सुरु होणार असून या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या सशस्त्र दलाच्या तुकडीकडे या स्थळाची सुरक्षा व्यवस्था असून या ठिकाणी परवानगीशिवाय कोणालाही प्रवेश निषीध्द आहे. प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रियेमध्ये मतमोजणी सहायक, मतमोजणी पर्यवेक्षक, सुक्ष्म निरीक्षक अशा 328 कर्मचा-यांचा सहभाग आहे. तर परिसरात पाचशे पोलीसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे.

यामध्ये चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात असलेल्या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघ क्षेत्रासाठी नेमून दिलेल्या मतमोजणी हॉलमध्ये 14 टेबल राहणार आहे. याकरीता 328 कर्मचारी व प्रत्येक टेबलसाठी राजपत्रित दर्जाचे मतमोजणी पर्यवेक्षक व मतमोजणी सहाय्यक राहणार आहे. तसेच मतमोजणी सूक्ष्म निरीक्षणासाठी मतमोजणी प्रक्रियेचीअचूकता तपासण्याकरीता व मतमोजणीची नोंद घेऊन ते निवडणूक निरीक्षकाकडे सुपूर्द करण्यासाठी एक मतमोजणी सहाय्यक नियुक्त केला जाणार आहे. तसेच प्रत्येक हॉल करिता अतिरिक्त सूक्ष्म निरक्षक देण्यात येणार आहे. तसेच निकाल अचूक असल्याबाबत पर्यवेक्षकाने भरलेला नमुना 17 सी भाग 2 च्या आकडेवारीशी तपासून अचूक असल्याची खात्री करतील. प्रत्येक फेरीचे निकालपत्र निवडणूक निर्णय अधिकारी सोबत तपासून समिक्षा करून घेतील जेणेकरून पुढे कोणत्याही पुनर्मोजणीसाठी वाव राहणार नाही. या सर्व बाबींची वेळोवेळी पारदर्शकता ठेवण्यात येणार आहे.

सकाळी 8 वाजता ईव्हीएम मशीन प्राप्त झाल्यानंतर मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सुरुवातीला पोस्टल बॅलेट पेपर पासून मोजणीला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर ईव्हीएम मशीनव्दारे मोजणी करण्यात येणार आहे. सर्वात शेवटी व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठया मोजल्या जाणार आहे. जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील पाच व्हीव्हीपॅट मशीन मधील चिठ्ठयांची मोजणी प्रत्येक मतदार संघातील प्रातिनिधीक निवड पध्दतीने केली जाणार आहे. (रॅन्डम पध्दतीने) त्यानंतर निकाल घोषित केल्या जाणार आहे.

नागरिकांसाठी 23 तारखेला मतमोजणी परिसरात शंभर मिटर अंतरावर जिल्हा प्रशासनाने थांबण्याची व्यवस्था केली आहे. या ठिकाणी लाऊडस्पिकरवर माहिती मिळणार आहे. शंभर मिटरच्या आतमध्ये कोणत्याही वाहनाला व नागरिकांना प्रवेश नाही. मतमोजणी कर्मचारी, जिल्हा प्रशासनाचे विशेष प्रवेशीका असणारे कर्मचारी, अनुषंगीक कामगार, निवडणूक आयोगाचे विशेष प्रवेश पत्र असणारे पत्रकार यांनाच फक्त प्रवेश आहे. या सर्व प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रण निवडणूक आयोगामार्फत करण्यात येणार आहे. यावेळेस प्रथमच व्हीव्हीपॅट मशीन व त्यातील चिठ्ठयांची मोजणी देखील होणार असल्यामुळे दरवेळीपेक्षा निकालाला अधिक वेळ लागू शकतो, अशी शक्यता जिल्हा मुख्य निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी व्यक्त केली आहे.

शुक्रवार, मे ०३, २०१९

7 राज्यातील 51 लोकसभा मतदार संघात होणार मतदान

7 राज्यातील 51 लोकसभा मतदार संघात होणार मतदान


सार्वत्रिक निवडणुका 2019 च्या पाचव्या टप्प्याचं मतदान येत्या मे रोजी

राज्य/केंद्रशासित प्रदेश
पाचव्या टप्प्यातील लोकसभा मतदार संघांची संख्या
एकूण मतदार
पुरूष मतदार
महिला मतदार
तृतीयपंथी मतदार
उमेदवारांची संख्या
मतदान केंद्रांची संख्या
बिहार
5
8766722
4678401
4088096
225
82
8899
जम्मू आणि काश्मीर*
2*
697498
361630
335854
14
22#
1254
झारखंड
4
6587028
3442266
3144679
83
61
5550
मध्य प्रदेश
7
11956447
6303271
5652941
235
110
15240
राजस्थान
12
23179623
12253615
10925883
125
134
23783
उत्तर प्रदेश
14
24709515
13259311
11448883
1321
182
28072
पश्चिम बंगाल
7
11691889
6004848
5686830
211
83
13290
एकूण
51*
87588722
46303342
41283166
2214
674#
96088
पाचव्या टप्प्यातील राज्यांची संख्या
7

जम्मू-काश्मीरमधल्या अनंतनाग लोकसभा मतदार संघात तीन टप्प्यात मतदान होत असून येत्या 6 मे रोजी शोपियान, पुलवामा तसेच लेह आणि कारगील या मतदार संघात मतदान होईल.
 बिहारमधल्या लोकसभा मतदार संघात मतदान
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात बिहारमध्ये येत्या 6 मे रोजी 5 मतदार संघात मतदान होणार आहे. सीतामढी, मधुबनी, मुझफ्फरपूर, सारन आणि हाजीपूर या मतदार संघात मतदान होईल. 6 महिलांसह एकूण 82 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 8 हजार 899 मतदान केंद्रांवर मतदान होईल.

राजस्थानातल्या 12 लोकसभा जागांसाठी मतदान
राजस्थानमध्ये येत्या 6 मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. गंगानगर, बिकानेर, चुरू, झुनझुनू, सिक्कर, जयपूर (ग्रामीण), जयपूर, अलवार, भरतपूर, करौली-धोलपूर, दौसा आणि नागाऊर या 12 मतदार संघात मतदान होणार आहे. या टप्प्यात 134 उमेदवार निवडणूक रिंगणात असून यामध्ये 16 महिला उमेदवारांचा समावेश आहे. पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी 23,783 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत.