Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जानेवारी १५, २०१८

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने प्राथमिक आरोग्‍य केंद्रांसाठी 20 कोटीचा निधी मंजूर

चंद्रपूर/प्रतिनिधी:                                                                                      
अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने खनिज विकास निधी अंतर्गत गोडपिपरी तालुक्‍यातील भंगाराम तळोधी, कोरपना तालुक्‍यातील नांदा, जिवती तालुक्‍यातील शेणगांव तर मुल तालुक्‍यातील राजोली येथे प्राथमिक आरोग्‍य केंद्रांच्‍या बांधकामासाठी प्रत्‍येकी 5 कोटी याप्रमाणे एकूण 20 कोटी रू. निधी मंजूर करण्‍यात आला आहे.
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्‍हयात आरोग्‍य सेवेच्‍या बळकटीकरणावर भर दिला असुन प्रामुख्‍याने खनिज विकास निधीच्‍या माध्‍यमातुन आरोग्‍य सेवेसाठी प्राधान्‍याने निधी उपलब्‍ध करण्‍याची भूमीका जाहीर केली होती. या भूमीकेला अनुसरून गोडपिपरी तालुक्‍यातील भंगाराम तळोधी, कोरपना तालुक्‍यातील नांदा, जिवती तालुक्‍यातील शेणगांव तर मुल तालुक्‍यातील राजोली येथे प्राथमिक आरोग्‍य केंद्रांच्‍या बांधकामासाठी निधी मंजूर करण्‍यात आला आहे. भंगाराम तळोधी, नांदा, जिवती आणि राजोली ही चारही गावे आदिवासीबहुल नक्षलप्रभावीत भागातील असुन याठिकाणी प्राथमिक आरोग्‍य केंद्रांचे बांधकाम करणे अत्‍यंत आवश्‍यकत होते. निधीअभावी यासंबंधीचे प्रस्‍ताव प्रलंबित होते. ही बाब लक्षात घेता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खनिज विकास निधीच्‍या माध्‍यमातुन सदर प्राथमिक आरोग्‍य केंद्रांसाठी 20 कोटी रू. निधी मंजूर केला आहे.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने नुकताच बल्‍लारपूर येथे लाईफ लाईन एक्‍सप्रेस हा आरोग्‍य विषयक उपक्रम संपन्‍न झाला असुन या माध्‍यमातुन विविध आजारांसंदर्भात तपासणी, रोग निदान, निःशुल्‍क रूग्‍णांवर करण्‍यात आल्‍या आहेत. टाटा ट्रस्‍टच्‍या माध्‍यमातुन चंद्रपूर जिल्‍हयात कॅन्‍सर रूग्‍णालय उभारण्‍याचा निर्णय झाला असुन वर्षभरात हे रूग्‍णालय रूग्‍णांच्‍या सेवेत रूजु होणार आहेत. चंद्रपूर जिल्‍हा सामान्‍य रूग्‍णालयात एमआयआय मशीन अभावी होणारी रूग्‍णांची गैरसोय लक्षात घेता श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था शिर्डी यांच्‍या माध्‍यमातुन 7.5 कोटी रू. निधी एमआरआय मशीनसाठी त्‍यांनी मंजूर करविला आहे.

खनिज विकास निधीच्‍या माध्‍यमातुन आदिवासी बहुल भागातील भंगाराम तळोधी, नांदा, जिवती आणि राजोली या गावांमध्‍ये प्राथमिक आरोग्‍य केंद्रांसाठी प्रत्‍येकी 5 कोटी रू. निधी मंजूर झाल्‍यामुळे या भागात उत्‍तम आरोग्‍य सेवा नागरिकांना मिळणार आहे.
mungantiwar साठी इमेज परिणाम

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.