नागपूर/ललित लांजेवार:
चंद्रपूर येथून जवळच असलेल्या लोहाराच्या जंगलात आंध्रप्रदेश येथील एका इसमाचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली.गुरुवारी सकाळी १० वाजता परिसरातील काही नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता मृतदेह कुजलेल्या स्थितीत होते.त्याच्या जवळ असलेल्या आधारकार्डावरून तो आंध्रप्रदेशातील रहिवासी असल्याचे समजते.
त्या आधार कार्डवर बुरीगेली लक्ष्मण अशी नोंद असून तो आंध्रप्रदेश राज्यातील निझामाबाद जिल्ह्यातील मंगलपहाड येथील रहिवासी असल्याचे समजते आहे. आंध्रप्रदेशातील व्यक्तीचा लोहाराच्या जंगलाशी काय संबध ?त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला. त्याची हत्या कि आत्महत्या ह्या सर्व अनुत्तरीत प्रश्नांचा तपास रामनगर पोलिस करीत आहे.