Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

police लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
police लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, एप्रिल ०४, २०२१

नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक; 22 जवान शहीद

नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक; 22 जवान शहीद




छत्तीसगडच्या विजापूरमध्ये नक्षलवादी हल्ल्यात आतापर्यंत 22 सैनिकांचे मृतदेह हाती लागले आहेत. त्याचवेळी, एक जवान अद्याप बेपत्ता आहे. या हल्ल्यात एकूण 32 सैनिक जखमी झाले असून, विजापूर रूग्णालयात 25 सैनिकांवर उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर छत्तीसगड पोलिसांनीही 9 नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा केला आहे. तसेच पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सुरक्षा दलाने घटनास्थळावरून एका महिला नक्षलवाद्याचा मृतदेहही ताब्यात घेतला आहे. शुक्रवारी रात्री केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या कोब्रा बटालियन, डी.जी.जी. आणि विजापूर व सुकमा जिल्ह्यातील एसटीएफची संयुक्त टीम नक्षलविरोधी कारवाईत रवाना झाली. विजापूर जिल्ह्यातील तारिम, उसूर, सुकमा जिल्ह्यातील मिनापा आणि नरसपुरम येथून सुमारे दोन हजार सैनिक नक्षलविरोधी कारवाईत सहभागी झाले होते.




छत्‍तीसगढ के बीजापुर जिले में माओवादियों के साथ मुठभेड में पांच सुरक्षाकर्मी शहीद और 12 अन्‍य घायल


छत्‍तीसगढ में बस्‍तर संभाग के बीजापुर जिले में आज माओवादियों के साथ मुठभेड में पांच सुरक्षाकर्मी शहीद हो गए और 12 अन्‍य घायल हो गए।




सुरक्षाबलों का एक संयुक्‍त दल इस क्षेत्र में बडी संख्‍या में उग्रवादियों की मौजूदगी का सुराग मिलने के बाद माओवाद रोधी अभियान पर था। जब यह दल तार्रेम क्षेत्र में पहुंचा तो दल पर माओवादियों ने घात लगाकर हमला किया। सुरक्षाकर्मियों की जवाबी कार्रवाई के फलस्‍वरूप मुठभेड शुरू हो गई। अंतिम समाचार मिलने तक दोनों ओर से गोलीबारी जारी थी।
अतिरिक्‍त सुरक्षाबल घटनास्‍थल पर रवाना हो गया है। दो हेलीकॉप्‍टर और नौ एम्‍बूलेन्‍स बीजापुर जिला मुख्‍यालय भेजे गए हैं।

मंगळवार, मार्च २३, २०२१

नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला, 3 जवान शहीद, 8 गंभीर जखमी

नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला, 3 जवान शहीद, 8 गंभीर जखमी



नक्षलवाद्यांनी DRG आणि ITBP च्या जवानांनी भरलेल्या बसला नक्षलवाद्यांना स्फोटांनी उडवून दिलीय. या स्फोटात 3 जवान शहीद झाले असून, 8 गंभीर जखमी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा स्फोट IED कडून छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये करण्यात आलाय. नक्षलवाद्यांनी काडेनर आणि मांडोडाजवळ जवानांच्या बसला लक्ष्य केले. जवान आपले ऑपरेशन पूर्ण करून परतत असतानाच नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. नक्षलवाद्यांनी केलेल्या IED स्फोटात DRG च्या (जिल्हा राखीव गार्ड) जवानांचा मृत्यू छत्तीसगडचे डीएम अवस्थी म्हणाले की, नारायणपूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या IED स्फोटात DRG च्या (जिल्हा राखीव गार्ड) जवानांचा मृत्यू झाला. तर काहींची प्रकृती चिंताजनक आहे.

मंगळवार, ऑगस्ट १८, २०२०

दारू तस्करांनी केली पोलीस निरीक्षकाला मारहाण

दारू तस्करांनी केली पोलीस निरीक्षकाला मारहाण

Big Breaking

मारहाणीचा विडिओ व्हायरल
चंद्रपूर जिल्ह्यात पोलिसच असुरक्षित
चिमूर तालुक्यातील धक्कादायक घटना

चंद्रपूर/ प्रतिनिधी:
जिल्ह्यात दारू तस्करांची हिम्मत दिवसेंदिवस वाढतच चालली असून, आज दारू माफियांनी पोलीस निरीक्षकाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना चिमूर तालुक्यात घडली आहे. 
शेगाव पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या सावरी बिडकर येथे हि घटना घडली आहे.


सावरी बिडकर येथे शेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधीर बोरकुटे व पोलीस हवालदार क्षीरसागर हे दारू विक्री संदर्भात तपासणीकरिता गेले होते. यावेळी दारू माफिया संदीप ठवरे, सुधीर ठवरे, सतीराम ठवरे यांनी पोलीस निरीक्षक सुधीर बोरकुटे व क्षिरसागर यांना मारहाण केली. आता पोलीस सुद्धा असुरक्षित असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. यापूर्वी चंद्रपूरात रामनगर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकास मारहाण झाली होती. 

बुधवार, ऑगस्ट ०५, २०२०

रुग्णालयातील महिला कामगाराच्या मृत्यूने वातावरण चिघळले

रुग्णालयातील महिला कामगाराच्या मृत्यूने वातावरण चिघळले

कामगारांनी रुग्णालयातच ठिय्या मांडून काम बंद केले


शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील नवजात शिशूंच्या अतिदक्षता विभागात काम करणाऱ्या संगीता पाटील यांना काल दिनांक चार ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान दरम्यान हृदयविकाराचा झटका आला.त्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागामध्ये भरती करण्यात आले.त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज सकाळी त्यांचे निधन झाले.विशेष म्हणजे वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कामगारांना नियमितपणे दर महिन्याला पगार दिला जात नाही.काही दिवसापूर्वी दोन टप्प्यांमध्ये कामगारांचे थकीत पगार दिले.परंतु पुन्हा पाच महिन्याचे पगार थकीत असल्याने कामगारांना प्रचंड आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत होता. अशातच संगीता पाटील यांच्या पतीचा सहा महिन्यापूर्वी मृत्यू सुद्धा झालेला होता. त्यांना प्रचंड आर्थिक अडचण असल्यामुळे त्या दररोज सहकारी कामगारांना पगाराविषयी विचारणा करित होत्या.आज अखेर मानसिक तणावामुळे त्यांना जीव गमवावा लाछला असा आरोप जन विकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी केला.संगीता पाटील यांच्या मृत्यूने सर्व कामगार संतप्त झाले. त्यांनी रुग्णालयात ठिय्या मांडला. यानंतर आमदार किशोर कामगार, नगरसेवक पप्पू देशमुख अधिष्ठाता डॉ.सुरपाम यांची याची अतिदक्षता विभागातील कार्यालयात बैठक झाली. या बैठकीमध्ये कामगार महिलेच्या अनाथ मुलाचे पालकत्व स्विकारणाऱ्या जवळच्या नातेवाईकाला कंत्राटी पद्धतीने नोकरी देण्याचा निर्णय झाला.सोबतच एक लाख रुपये मुलाच्या खात्यामध्ये फिक्स डिपॉझिट करण्याचे ठरविण्यात आले. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सध्या कंत्राट रद्द झाल्याने थेट वैद्यकीय महाविद्यालयातील निधीतून अर्थसहाय्य करण्याची मागणी करण्यात आली.मात्र निधी नसल्यामुळे केवळ पंचवीस हजार रुपये देणे शक्‍य असल्याचे अधिष्ठाता यांनी सांगितले. त्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी 25000 रुपये मदत जाहीर केली तसेच डॉ. सुरपाम यांनी 40000 जन विकास कामगार संघा तर्फे अध्यक्ष देशमुख यांनी 10000 रुपये देण्याचे जाहीर केले. एकूण एक लाख रुपये कामगार महिलेच्या मुलाच्या नावावर फिक्स डिपाॅजिट करण्यात येणार आहे. त्यानंतर पाटील यांचा मृतदेह पोस्टमार्टम साठी नेण्यात आलामात्र पाटील यांच्या मृत्यू नसून वैद्यकीय शिक्षण विभागाने केलेला खून आहे. सहा-सहा महिने पगार नसल्याने कामगारांना प्रचंड मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागतो. आणि त्यामुळे या विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध पोलिसात तक्रार करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे देशमुख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविले.

सोमवार, जुलै २०, २०२०

नागपूर:भरदिवासा गोळीबाराने कळमेश्वर हादरले..!

नागपूर:भरदिवासा गोळीबाराने कळमेश्वर हादरले..!


पति पत्नी वर गोळीबार
गुन्हेगार क्षेत्रातील दोन टोळ्यांचा संघर्ष शिगेला
आपसी वादाचा संशय
नागपूर / अरूण कराळे (खबरबात):
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर शहरात लोहकरे लेआऊट येथे विवाहित दाम्पत्यावर भर दिवसा गोळीबार झाल्याची घटना दिनांक 20 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास घडली या घटनेमध्ये गणेश सुधाकर मेश्राम वय 32 व त्याची पत्नी प्रियंका गणेश मेश्राम वय 28 दोघेही राहणार जयताळा नागपूर हल्ली मुक्काम लोहकरे लेआऊट कळमेश्वर झालेल्या गोळीबारात गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ शासकीय रुग्णालय नागपूर येथे हलविण्यात आले आहे.
या घटनेमुळे कळमेश्वर शहरात एकच खळबळ उडाली आहे. गणेश मेश्राम वय 32. त्याची पत्नी प्रियंका गणेश मेश्राम वय 28 व त्यांचा एक 5 वर्षीय मुलगा आरव (मूळ रहिवासी जयताळा नागपूर)मागील दोन वर्षापासून कळमेश्वर येथील लोहकरे ले-आऊट येथील सुधाकर खाडे यांच्या घरी भाड्याने दुसऱ्या माळ्यावर राहत होते गणेश मेश्राम हा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या असल्याचे बोलले जात आहे व त्याच्यावर नागपूर येथील पोलीस स्टेशनला विविध प्रकारचे गुन्हे सुद्धा दाखल आहे घटनेच्या दिवशी सात आठ तरुण तोंडाला काळे कपडे बांधून एका चार चाकी गाडीतून आले व तो राहात असलेल्या घरमालकाच्या घरी जाऊन दारात उभ्या असलेल्या सुधाकर खाडे यांच्या सुनेला त्यांनी न विचारता प्रवेश केल्याने त्या महिलेने त्यांना हटकले असता तिच्या कपाळावर बंदूक ठेवून तिला धमकी दिली यातच तिने ओरडून दरवाजे बंद केले नंतर गणेश मेश्राम हा राहत असलेल्या दुसऱ्या माळ्यावर ते तरुण गेले त्यांनी घरात घुसून जखमी गणेशच्या पाठीवर तर त्याची पत्नी प्रियांका हीच्या पोटावर गोळया झाडल्या गोळी झाडताच जखमी गणेश वरून शेजार्‍याच्या घरी उडी घेऊन पळाला गोळ्या झाडल्या नंतर सर्व हल्लेखोर चारचाकी गाडीने पळून गेले हा सर्व प्रकार एकमेकांविरुद्ध गॅंगवॉर च्या माध्यमातून घडल्याची प्राथमिक माहिती आहे 
जखमी गणेशही गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची माहिती असून त्याच्यावर नागपूर पोलीस दलामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली जखमींवर कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून नागपुर येथे हलविन्यात आले आहे. गोळीबाराच कारण अद्याप कळू शकलेले नाही.झालेल्या गोळीबाराचा आवाज झाल्याने आजूबाजूच्या घरातील रहिवासी बाहेर निघाले व आरडाओरड सुरू केली गर्दी जमत असल्याने आरोपींनी तेथून पळ काढला सदर घटना अवैध धंद्याच्या वर्चस्वाच्या लढाई वतून झाली असल्याचे बोलले जात आहे 
सदर घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधिक्षक मोनीका राऊत उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सरंबळकर, कळमेश्वर पोलीस निरीक्षक मारुती मुळूक स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी यांनी घटनास्थळी पोहोचून घटनास्थळावरील दोन रिकामे काडतूस, रक्ताचे नमुने आधी साहित्य जप्त करून तपास सुरु केला आहे वृत्त लिहिस्तोवर आरोपींना अटक करण्यात आली नव्हती.
झालेल्या गोळीबाराच्या घटनेमध्ये कळमेश्वर शहरातील एका व्यक्तीने आरोपींना जखमी गणेश चे घर दाखविल्याची माहिती असून आरोपी नागपूर परिसरातील जयताळा या भागातील असल्याचे विश्‍वसनीय वृत्त प्राप्त झाले आहे. दरम्यान नागपूर शहरातील अनेक तडीपार गुंड प्रवृत्तीचे काही तरुण कळमेश्वर शहर परिसरात विनापरवानगी ने राहुन कळमेश्वर तालुक्यात अवैध धंदे करीत असल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे हे विशेष.