Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, ऑक्टोबर ११, २०२०

वाई- मेणवली येथील नाना फडणिसांचा वाडा

 वाई- मेणवली येथील  नाना फडणिसांचा वाडा  


.         दि  ११ आॅक्टोबंर २०१८ 

फेसबुक लिंक https://bit.ly/3iLaFuN
मेणवली हे गाव वाई पासून साधारण ४ किमी अंतरावर आहे . नाना फडणवीस वाडा सहा चौकोनी भागात विभागला असून, तठबंदीने सर्व बाजू बंदिस्त केलेल्या आहेत.
कृष्णाकाठी असलेला वाडा पूर्वाभिमुख असून त्याच्या पश्चिमेकडे म्हणजेच वाडय़ाच्या मागील बाजूने कृष्णेत उतरण्यासाठी पायर्‍यांचा घाट आहे. हा वाडा मराठा वास्तुशैलीत बांधला आहे. पर्यटक पाहण्यासाठी येतात.

वाई- मेणवली येथील  नाना फडणिसांचा वाडा

  .         मेणवली येथील वाडा ही वाई परिसरातील अत्यंत सुस्थितीत असलेली मध्ययुगीन मराठा वाडावास्तुशैलीतीत प्रशस्त हवेली असून तीत मुत्युदंड चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी काही किरकोळ दुरुस्त्या व रंगरंगोटी करण्यात आली होती(१९९५-९६);तरीसुद्धावाड्याचा मूळ ढाचा सुस्थितीत असून फडणीस यांना तत्कालीन छत्रपतींचे सरदार भगवंतराव त्र्यंबक पंतप्रतिनिधी आणि रघुनाथ घनश्याम मंत्री(सातारा)यांनी इ.स.१७६८ मध्ये वाईच्या पश्चिमेकडील हा भाग  इनाम म्हणून दिला.तिथे नानांनी मेणवली हा टुमदार गाव वसविला आणि त्या ठिकाणी कृष्णा नदीकाठी चारसोपी पूर्वाभिमुख भव्य वाडा इ.स१७७० मध्ये बांधला.

या वाड्याच्या मागे नाना फडणीसांनी चंद्रकोरीच्या आकाराचा घाट बांधला आणि मेणवलेश्वर(मेणेश्वर)आणि वाडा हे भित्तिचित्रांनी अलंकृत केले.या दुमजली व पोटमाळा असलेल्या भव्य वाड्याच्या भोवती दगडी भक्कम भिंत असून पूर्वेस मुख्य प्रवेशद्वारावर नौबतखाना(नगारखाना)आहे. त्याच्या आतील बाजूस उघड्या सोप्यासमोर कारंजे असून आतील उजव्या बाजूस सुरेख वर्तुळाकार चिरेबंदी पत्थरांत बांधलेली मोठी विहीर आहे.वरती त्याला चार रहाटगाडगी होती.या विहिरीचे पाणी खापरी नळाद्वारे वाड्यात सायफन पद्धतीने सर्वत्र नेले होते. या खापरी नळांचे काही अवशेष अद्यापि अवशिष्ट आहेत.उघड्या सोप्याच्या बाजूस उजव्या बाजूने गेले असता माजघर वं त्याला लागून देवघर आहे.भिंतीतील पहिल्या जिन्यावरून वर गेले असता सहाखणी दिवाणखाना लागतो

त्याच्या लाकडी कमानी आणि छत अनुक्रमे नक्षीदार व कलाकुसरयुक्त समांतर समभुज चौकोनी पदकांच्या रचनांनी युक्त आहे. तिथे झुंबरे,हंड्या यासाठी आकडे  ठेवलेले आहेत.दिवाणखान्याला लागून नाना फडणीसांचे शयनगृह होते.त्यात नानांचा भव्य पलंग ठेवलेला आहे.पहिल्या चौकात सुमारे एक मीटर उंचीवर चारी बाजूंनी खोल्या बांधलेल्या असून अशीच रचना उर्वरित तीन चौकात आहेत.६x६ मीटर चौरस क्षेत्रफळांचे उघडे चौक असून त्यांतील पाण्याचा निचरा होण्याची जलनिस्सारण योजना आधुनिक अभियांत्रिकीला आव्हान देणारी आहे. चौकांच्या योजनेमुळे भरपूर प्रकाश व हवा आपातत: वरच्या मजल्यापर्यंत खेळती राहते.तसेच भिंतीचा गिलावा मातीत गवत कुजवून केलेला असल्यामुळे वं त्यावर बारीकसा चुन्याचा थर दिल्यामुळे आज सुमारे दोन-अडीचशे वर्षे झाली,तरी त्याला चिरा पडलेल्या नाहीत किंवा पोपडे पडत नाहीत,अशा उत्तम सुरेख भिंतीवर शक्य झाले आहे.वाड्यातील स्त्री-वर्गाला घाटावर स्नानासाठी जाण्यासाठी मागील  बाजूस स्वतंत्र व्यवस्था केली आहे.

या वाड्यातील जिऊबाईची खोली ही उत्तरेकडील भागात असून तिथली भित्तिचित्रे सुस्थितीत आहेत; कारण नाना फडणीसांच्या या शेवटच्या पत्नीने ब्रिटिशांनी जप्त केलेले उत्पन्न सोडविण्यासाठी अथक प्रयत्न केले आणि सुदैवाने तिला दीर्घ आयुष्यही लाभते.तिने आपल्या जीवनातील दीर्घकाळ मेणवलीतीलया वाड्यात व्यतीत केला.ऐवढेच नव्हे तर नाना फडणीसांनी त्याच्याकडे असलेल्या काही मौल्यवान वस्तू,कागदपत्रे अखेरच्या दिवसांत इथे सूरक्षितत्तेच्या दृष्टिकोनातून आणून ठेवली होती .त्यांचे जतन,संरक्षण जिऊबाईंनी केले.एवढेच नव्हे तर ती नीटनेटकी लावून ठेवली.त्यामुळे रावबहादूर द.ब.पारसनीस किंवा इतिहासाचार्य वि.का.राजवाडे यांना हा अमोल ऐतिहासिक ठेवा पाहावयास मिळाला.रावबहादूर द.ब.पारसनीसांनी तर मेणवली दप्तरातील हजारो कागद हस्तगत करून ते रुमाल सातारच्या पारसनीस म्युझियमध्ये सुव्यस्थित ठेवले.पुढे इ.स.१९३८ मध्ये ब्रिटिश शासनाने ते त्यांच्या वारसांकडून विकत घेऊन पुण्याच्या डेक्कन कॅालेजमध्ये संशोधकांना उपलब्ध होतील,अशी व्यवस्था केली.सदर वाड्यात नाना फडणीसांचे केव्हा आणि किती दिवस वास्तव्य होते,या विषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही;तथापि नाना फडणीस इ.स.१७९१ मध्ये सवाई माधवराव पेशव्यांबरोबर वाईस आले असता त्यांचा मुक्काम मेणवली येथे असल्याची नोंद आहे.तसेच दुसरा बाजीरांव(कार -१७९५-१८१८)याने नाना फडणिसांना बडतर्फ केल्यानंतर ते वाड्यात काही महिने मुक्कामास होते.याशिवाय पहिल्या माधवराव पेशव्यांच्या कारकिर्दीत(कार १७६१-१७७३)त्यांनी वाड्याचे बांधकाम केल्यानंतर त्यांचा सपत्नीक मुक्काम येथे अनेक दिवस होता.

____________________________
🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
    माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.