Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, एप्रिल ०८, २०१९

निवडणूक आयोगाचे पाऊल पुढे

    विशेष लेख   


टक्केवारी सोबतच सहभागाचा पुढाकार
भारत निवडणूक आयोगाने यावेळेच्या निवडणूकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासोबतच जनजागृतीसाठीही पुढाकार घेतला आहे.वेगवेगळ्या उपक्रमासोबतच यावेळी आचारसंहिता भंग करणा-यांवर जनतेचेच नियंत्रण आले आहे.

देशाचा सर्वात मोठा राष्ट्रीय महोत्सव साजरा होत असून या महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन भारतीय निवडणूक आयोग विविध माध्यमातून करीत आहे .हा राष्ट्रीय महोत्सव म्हणजे ‘मतदानाचा दिवस’.

भारतीय राज्यघटनेने देशातील नागरिकांना दिलेला सर्वात मोठा हक्क मतदानाचा असून या हक्कामुळे लोकशाही सक्षम करण्याचा अधिकार जनसामान्यांनादिलेला आहे. मतदानाचा हक्क बजावून देशाच्या राष्ट्रीय महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन निवडणूक आयोग करीत आहेच. परंतु, अनेक सामाजिक संस्था, शाळा,महाविद्यालय, शासकीय कार्यालय या जनजागृतीच्या माध्यमातून मतदारांना आवाहन करीत आहे.

मतदानातून देशाच्या लोकशाहीला सक्षम करू शकतो तो म्हणजे ‘मतदार राजा’. देशाचा सर्वतोपरी विकास व्हावा आणि जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी हे सक्षम असावे या हेतूने मतदारांना निर्भीडपणे कोणत्याही दबावाला बळी न पडता मतदान करता यावे यासाठी मतदारांमध्ये जागृती असणे गरजेचे आहे मतदारांना योग्य पद्धतीने मतदान करता यावे व मतदान करताना कोणतीही अडचण येऊ नये मतदान सोयीस्कर व्हावे यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने विविध उपक्रम राबविले आहे.

स्वीप ऍक्टिव्हिटी :-

भारतीय निवडणूक आयोगाने मतदार आणि मतदान जनजागृतीसाठी स्वीप ऍक्टिव्हिटी सुरू केलेली आहे.

स्वीप (SVEEP - Systematic Voters’ Education and Electoral Participation) म्हणजे मतदानाच्या प्रक्रियेत जागृतता वाढविण्यासाठी तसेच निवडणूकप्रक्रिया बद्दल नागरिक मतदार यांना शिक्षित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विविध पद्धती आणि माध्यमांद्वारे विविध हस्तक्षेपाचे कार्यक्रम म्हणजे स्वीप ऍक्टिव्हिटी होय.

स्वीपची पुढिल प्रमाणे वैशिष्टे म्हणजे, 18 वर्षावरील सर्वसामान्य तसेच नव्याने विवाहीत स्त्रीया, स्थलांतरीत केलेल्या मतदारांवर विशेष लक्ष केंद्रीत करुन त्यांची नोदणी करणे, हि नोदणीची सुविधा ERO, AERO ऑफिस, विशेष शिबीरे या अंतर्गत घेवून नोदणी करणे, मतदानांची टक्केवारी सुधारण्यासाठी जनजागृती करणे ,ज्ञान आणि जबाबदारी मतदारांना समजून मतदानांचा हक्क बचावण्यासाठी प्रोत्साहित करणे, मतदारांना मतदार प्रक्रियेचे ज्ञान देणे, मतदान ओळखपत्र याविषयी माहिती देणे, विविध संस्था, सरकारी विभाग, सिव्हिल सोसायटी संस्था, स्वयंसेवी संस्था एकत्र येवून मतदार जनजागृतीचे कार्यक्रम घेणे, या प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त शिक्षण आणि संप्रेषणचा जास्तीत जास्त वापर करणे.

मतदार साक्षरता क्लब, मतदार जागृती मंच, चुनाव पाठशाला, संकल्प पत्र, पथनाट्ये, विविध माहिती फलके-पत्रके, आकाशवाणीमध्ये मतदार जागृतीसाठी ऑडीओ क्लिप–जिंगल्स, चित्रपट गृहामध्ये मतदान जागृतीबाबत चित्रफिती दाखविणे, सायकल रिक्षा किंवा चित्ररथांच्या माध्यमातून मतदान जागृती, महिला, युवक ,दिव्यांग व वृध्दांसाठी मतदान जागृती कार्यशाळा, इव्हिएम आणि व्ही.व्ही.पॅट विषयी माहिती देणे इत्यादी नाविण्यपूर्ण उपक्रम स्वीप अंतर्गत घेण्यात येतात.

1950 मतदार मदत हेल्पलाईन :-

निवडणूकीमध्ये मतदारांना कोणतीही अडचण येवू नये व निवडणूक प्रक्रियेत सुसूत्रता यावी त्याचबरोबर मतदारांना त्यांची शंका आणि सुचना यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने 1950 हि मतदार हेल्पलाईन सुरू केलेली आहे.

निवडणूक प्रक्रिया व मतदानाविषयी माहिती पुरविणे, मतदारांना मतदान यादीतील नावाची खात्री करण्यासाठी, निवडणूकीमध्ये आदर्श आचार संहितेच्या उल्लंघनाबाबत तक्रारीसाठी, मतदानासंबंधी विविध शंका निरसन करण्यासाठी 1950 चा उपयोग करु शकतात. हि सुविधा 24 तास उपलब्ध असून या संदर्भातील माहिती मराठी, हिंदी व इंग्रजी या तीनही भाषांमधून मिळू शकते या महत्वपूर्ण वैशिष्ट्यांमूळे 1950 हि हेल्पलाईन मतदारांना आपलीशी वाटत आहे.

सी-व्हीजील ॲप :-

निवडणूकीदरम्यान आदर्श आचार संहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारीसाठी भारतीय निवडणूकींनी 18 मार्च ला सी-व्हीजील ॲप पूर्ण देशभरात लागू करण्यात आली.या ॲप चे वैशिष्टे म्हणजे ही ॲप फ्रेंडली असून या ॲपचा वापर निवडणूकीच्या अधिसूचनेपासून तर मतदानाच्या दुस-या दिवसापर्यंत केला जावू शकतो. सी व्हिजिल ॲपमध्ये तक्रार नोंदणी झाल्यानंतर अवघ्या 5 मिनिटांमध्ये जिल्हयातील जिल्हा नियंत्रण कक्षाकडे तक्रार दाखल होवून या ॲप अंतर्गत तक्रार नोंदविली गेली तर अवघ्या100 मिनिटांच्या आत तक्रारीची स्थिती तक्रारकर्त्यांला प्राप्त होईल.

सी व्हिजिल ॲपवर पुढिल तक्रारी नोंदविता येतात. मतदारांना पैसा, मद्य आणि अमली पदार्थाचे वाटप करणे, शस्त्र वापर, मतदारांना मारहाण अथवा दमबाजीच्या प्रकार, जमावाला चिथावणीखोर भाषण देणे,पेड न्युज आणि फेक न्युज संबंधी,मतदारांना आमिष म्हणून वस्तूचा वापर,मतदारांची मोफत वाहतूक करणे,उमेदवारांच्या मालमत्ता अपात्रतेसंबंधी व इतर तक्रारी यावर नोंदविता येवू शकते. www.eci.gov.in,www.ceo.maharastra.gov.in, www.mahanews.gov.in हे महत्वपूर्ण संकेतस्थळवरून मतदार निवडणूकीसंदर्भात माहिती घेवु शकतो.

दिव्यांग मतदारांसाठी पी.डब्ल्यू.डी ॲप :-
दिव्यांग मतदारांचे प्रमाण वाढावे आणि सर्व दिव्यांगांना मतदान करता याव्यात यासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्य,जिल्हा पातळीवर मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांसाठी सेवा उपलब्ध करण्याचे निर्देश दिलेले आहेत.यामध्ये दिव्यांगांना मतदान केंद्रावर व्हिलचेअर,पाण्याची व्यवस्था,रॅम्प,ॲम्बुलन्सची व्यवस्था करण्यात येणार असून या साठी एक खास ॲप दिव्यांग मतदारांसाठी निवडणूक आयोगाने तयार केलेली आहे हे ॲप म्हणजे पी.डब्ल्यू.डी ॲप.

पी.डब्ल्यू.डी. ॲप ची खास वैशिष्टे म्हणजे दिव्यांग किंवा कुटुंबीयांना हि ॲप गूगल प्लेस्टोरवरून डाऊनलोड करून हि ॲप हिंदी किंवा इंग्रजी या भाषेतून वापरता येईल.या ॲपच्या माध्यमातून नवीन दिव्यांग मतदार नोंदणी, मतदान केंद्रापर्यंत पोहचण्याची मागणी, मतदान केंद्र बदलून देण्याची मागणी, व्हिलचेअरची मागणी, मतदान केंद्रावरील अधिका-यांची माहिती तसेच मतदान केंद्रसुध्दा शोधता येईल यासर्व सूविधा पी.डब्ल्यू.डी. ॲप दिव्यांग मतदारांना पुरविण्यात येईल. त्याचबरोबर अंशत: अंध असणा-या मतदारांना मॅग्नीफायर (अक्षर वा चिन्ह मोठे दिसणारा दुर्बीणसारखा रासायनिक पारदर्शी प्लॅस्टिक पेपर) चा उपयोग करुन मतदानाचा हक्क बजावता येईल.

इ.व्ही.एम बरोबर व्ही.व्ही.पॅट :-
मतदान करतांना पारदर्शकता यावी आणि मतदारांना कोणाला मतदान केले याची खात्री करण्यासाठी निवडणूक आयोगाने या निवडणूकीमध्ये इ.व्ही.एम बरोबर व्ही.व्ही.पॅटची व्यवस्था सुध्दा केलेली आहे.मतदारांना खात्री बरोबर विश्वास मतदानांच्या माध्यमातून मिळणार असून निवडणूक प्रक्रिया आणखीनही सक्षम झाली आहे.

मतदानाच आहे श्रेष्ठदान,लोकशाहीला बळकट करूया,चला मतदान करुया,नवे वारे नवी दिशा,मतदानच आहे उद्याची आशा अशा विविध घोषवाक्य चित्ररथावर,पथनाट्यांच्या माध्यमातून सर्वदूर एकण्यास मिळत आहे.या जनजागृतीतून 100 टक्के मतदान करण्याचे आवाहन होत आहे.

सचिन सुरेश दळवी
मु.पो:-निमगांव ता:- नांदूरा जि:-बुलडाणा

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.