गेल्या काही महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. त्यामुळे अनेक भावी उमेदवार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची वाट पाहत आहेत. अशातच या निवडणुकीबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.
आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणूक या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्याच्या दरम्यान निवडणुका होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्य निवडणूक आयोगाने एका राजपत्रामध्ये निवडणुकीचा उल्लेख केला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका आणि पोटनिवडणुका यासाठी मतदार याद्या अंतिम करण्यासाठी अधिसूचना काढण्यात येईल, असे राज्य निवडणूक आयोगाने सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल मोठे संकेत दिले आहेत. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाचा निकाल रखडला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय लागतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
ओबीसी आरक्षणाचा अद्याप प्रलंबित निकाल लागला नाही, तर राज्यात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबई-पुण्याह राज्यातील ११ महापालिकांची मुदत गेल्या वर्षी १५ मार्च रोजी संपली आहे. तर महापालिकेची मुदत संपून दोन वर्षांचा काळ लोटला आहे.