Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च १८, २०१९

2070 मतदान केंद्रांवर “ चुनावी पाठशाला


चंद्रपूर, दि.18 मार्च
चांगली व मजबूत लोकशाही निर्माण होण्यासाठी अधिकाधिक लोकांनी मतदानात मोठ्या संख्येने भाग घेऊन सरकार निवडण्याची गरज आहे. लोकसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी गेल्या निवडणुकीपेक्षा वाढविण्याकरीता निवडणूक आयोगाद्वारे विविध जनजागृती मोहीमा राबविण्यावर भर दिला जात आहे. मतदारांना त्यांच्या मताचे महत्व पटवून देण्यासाठी तसेच निवडणूक प्रक्रियेबाबत साक्षरता वाढविण्यासाठी चुनावी पाठशालाद्वारे सर्व माध्यमिक शाळा, महाविद्यालये, नागरिक यांना जोडण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांच्या निर्देशानुसार आगामी लोकसभा निवडणूक 2019 साठी चंद्रपूर जिल्हयातील मतदारसंघातील सर्व 2070मतदान केंद्रावर चुनावी पाठशाला (ELC - Communities) स्थापन करण्यात आल्या आहेत.

चुनावी पाठशाला स्थापन करण्याचे मुख्य उद्देश म्हणजे मतदारसंघातील लोकसंख्या निर्धारीत करून मतदार नोंदणी निवडणूक प्रक्रियेशी संबंधित प्रात्यक्षिकासह नागरिकांना शिक्षित करणे, EVM / VVPAT या मतदान यंत्रांची ओळख त्यांची वैधता व त्याद्वारे राबविण्यात येणाऱ्या निवडणूक प्रक्रियेबाबत जनजागृती करणे, नागरिकांना त्यांच्या मताची किंमत तसेच निर्भयपणे मतदान करण्याची नैतिक जबाबदारी याबाबत जनजागृती करणे. समाजात निवडणूक साक्षरता वाढविण्यासाठी निवडणूक साक्षरता क्लबच्या सदस्यांच्या मदतीने निवडणूक प्रक्रियेबाबत साक्षरता वाढविणे. Every vote counts आणि No Voter to be left behind या आयोगाच्या घोषणेनुसार नागरिकांमध्ये निवडणूक प्रक्रियेत सहभाग व मतदान करण्याचे नैतिक कर्तव्य याबाबत समाजात वातावरण तयार करणे होय.

चुनाव पाठशाला ही सर्व जनतेसाठी असून यामधे 14 ते 17 वयोगटातील भावी मतदार तसेच शाळा सुटलेले संभाव्य मतदार, 18 ते 19वयोगटातील नवमतदार, तरुण व मध्यवयीन स्त्रिया, वरिष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, 14 वर्षे वयोगटातील शाळाबाह्य मुले, त्या त्या मतदारसंघातील विशेष गट जसे आदिवासी इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या समन्वयाने चुनाव पाठशाला स्थापन करून त्या मतदान केंद्राचे नाव त्या त्या चुनाव पाठशाळेला देण्यात आले आहे.

शासकीय अधिकारी - कर्मचारी तसेच अराजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले स्वयंसेवक तसेच स्वयंप्रेरणेने कार्यरत, सहकार्य करणारे शिक्षकगण,पंचायत कार्यालय किंवा नगर पालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने नागरिकांमधून सदस्यांची व शिक्षित संयोजकाची नेमणूक करण्यात येत असून त्यांची मतदान प्रशिक्षक म्हणून नेमणूक करण्यात येत आहे. संबंधित मतदान केंद्रावर BLO हे चुनाव पाठशाळेचे नोडल ऑफिसर म्हणून कार्यरत राहणार आहेत. चुनाव पाठशाला संदर्भात नियोजित कृती कार्यक्रमाचे आयोजन सर्व 2070 मतदान केंद्रावर 23 मार्च पर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) तथा नोडल अधिकारी (स्पी) चे दिपेंद्र लोखंडे यांनी दिली.0000

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.