Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च १८, २०१९

हिरापूर येथील युवक मजुराचा करंट लागून मृत्यू




नुकसान भरपाईकरिता कृषी रोपवाटिकेत मृतदेहासह आंदोलन

हिरापूर, ता सावली- येथील युवक मजूर वृंदन गेडाम हा युवक मजुर व्याहाड खुर्द येथील कृषी रोपवाटिकेत कामावर असताना 12 मार्चला विजेचा करंट लागून गंभीर जखमी झाला होता. उपचाराकरिता नागपूर येथील शासकीय रुग्णालयात भरती केले मात्र आज त्याचा मृत्यू झाला. कृषी विभागाने त्याचे कुटुंबियांना आर्थिक भरपाई द्यावी या मागणीसाठी पंचायत समिती सदस्य विजय कोरेवार यांचे नेतृत्वात मृतदेहासह आंदोलन केले. यानंतर कृषी अधिकारी मडावी यांनी 2 लाखाची भरपाई देण्याचे आश्वासन दिल्यानंतर अंत्यविधी करण्यात आली. यावेळी आदिवासी संघटनेचे अध्यक्ष केशवजी तिरणीक, अतुलभाऊ कोडापे, मुन्नाभाऊ स्वामी, नितीनभाऊ गोहणे यासह गावकरी व नातेवाईक मोठया प्रमाणात होते. ठाणेदार धुळे साहेब, नायब तहसीलदार चिडे साहेब यांनी मध्यस्थीची भूमिका घेत प्रकरण शांत केले

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.