उमेश तिवारी/कारंजा (घाडगे):
कारंजा येथील सनशाईन स्कूल चे संचालक प्रेम महिले यांची संकल्पना
स्थानिक सनशाईन स्कुल, कारंजा चे संचालक प्रेम महिले यांचे संकल्पनेतून शहरात पक्षांकरिता मातींचे जलपात्र वाटप उपक्रम राबविण्यात येत आहे.
शालेय परिसरात अनेक झाडे असून त्यावरील पक्षांची पाण्याकरिता वणवण पाहता परिसरात प्रत्येक झाडाला पात्र लावण्यात आले आणि पक्षांना दिलासा मिळाला त्याचसोबत परिसरात पक्षांचे वाढते प्रमाण पाहता शहरात सुद्धा घराघरात व झाडांवर जलपात्र असावे असे वाटले परंतु एवढी पात्र विकत घेऊन वाटणे अवघड कार्य होते आणि नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जुळावे करिता फेसबुक व व्हाट्सउप वर जलपात्र दान करण्याचे आवाहन करण्यात आले आणि तात्काळ एका दिवसात ५०० पात्र प्राप्त झाले जे सनशाईन च्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घरोघरी वाटप करणे सुरू आहे आणि ज्या दुकानजवळ झाडे आहे त्यांना पाणी टाकण्याची जवाबदारी देऊन त्यानां पात्र देण्यात आले,
समाजमाध्यमावरील संदेश वाचुन खालील मान्यवरांनी जलपात्र दिलीत राम मोटवाणी ३५, दिनेश रायचुरा २० , गणेश महिलेे २०,हरिष भांगे ३५,ग्यानू भाऊ बुधवाणी २० , पखाले सर १० ,गजानन ढोबाळे ५, मारोतिभाऊ लोखंडे ,कमलेश कठाणे, ३५ , स्व. तनया प्रांजळें* स्मृती प्रित्यर्थ श्री. रामभाऊ प्रांजळें ५०, नौशाद शेख १० ,हेमंत बन्नगरे १० ,शुभम वानखेडे २०,रमाकांत दळवी २५, स्व. अमोलजी वलगावकर सर स्मृति प्रित्यर्थ दिलीप जसुतकर व राहुल पैठणे तर्फे ५०, संवेदना युवा मंच कारंजा तर्फे १०, पुरुषोत्तमजी (मुन्नाभाऊ) अग्रवाल २० व सनशाईन स्कुल कारंजा तर्फे १२० तसेच साधारणतः ७५ विद्यार्थ्यांनी स्वखर्चने घरी पात्र लावलेले आहेत. ज्यांना पात्र हवे असेल किंवा दान करावयाचे असल्यास संयोजक प्रेम महिले यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. साधरणात १००० जलपात्र वाटपाचे लक्ष्य ठेवण्यात आलेले आहे आणि त्याला सर्व स्तरावरून सहकार्य मिळत आहे.