Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च १८, २०१९

चायवाले गेले; चौकीदार आले

17 व्या लोकसभेत राजकीय पक्षांनी विकासाच्या मुद्याला दिली बगल



खापरखेडा-प्रतिनिधी/ सुनील जालंदर

देशात येणाऱ्या 17 व्या लोकसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे.. 11 एप्रिल ते 19 में दरम्यान 7 टप्प्यात मतदान होणार आहे.. 23 में रोजी मतमोजणी होणार आहे.. मात्र यादरम्यान मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत गाजलेला चायवाला ऐवजी 17 व्या लोकसभेच्या निवडणुकीत चौकीदार मुद्दा महत्वाचा झाला असून राजकीय पक्ष विकासाच्या मुद्याला बगल देत असल्याचे दिसून येत आहे.

देशात 16 व्या लोकसभेत विकासाच्या मुद्दावर निवडणुका झाल्यात. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीनी 'सब का साथ सब का विकास' मेक ईन इंडिया डिजिटल इंडिया, शेतकरी आत्महत्या, कर्जमुक्ती, आरक्षण, परराष्ट्रीय धोरण आदि अनेक विकासात्मक मुद्देसोबत चायवाला मुद्दा गाजला होता रेल्वे स्टेशन वर चहा विक्री करणाऱ्याचा मुलगा देशाचा प्रधानमंत्री झाला असल्याचे ठासून सांगत होते त्यामुळे मोदी सर्व सामान्य नागरिकांची सहानुभूती मिळविण्यात यशस्वी झाले व स्पष्ट बहुमत मिळवून देशाचे प्रधानमंत्री झाले देशात 60 वर्ष सत्ता गाजविणाऱ्या कांग्रेस पक्षाला जेमतेम 44 जागावर समाधान मानावे लागले चायवाले का जादू अशी मानसिकता भाजप नेते, कार्यकर्ता यांच्यासह भाजप मित्रपक्षात झाली होती 10 मार्च ला 17 व्या लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले मात्र या निवडणुकीत काळेधन, प्रत्येक नागरिकांच्या खात्यात 15 लाख, 'सब का साथ सब का विकास' डिजिटल इंडिया मेक ईन इंडिया, राम मंदिर, भारत पाकिस्थान, आरक्षण, शेतकरी आत्महत्या, कर्जमुक्ती आदि मुद्यांना बगल दिली असल्याचे दिसून येत आहे.

17 व्या लोकसभेच्या निवडणुकीत फक्त आणि फक्त चौकीदार मुद्या महत्वाचा झाला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्यासह काही सत्ताधारी पक्षाचे नेते आपल्या नावासमोर चौकीदार लावतांना आढळून येत आहे. चौकीदार हा मुद्दा भाजपला आयता मिळाला असून राहुल गांधी यांनी राफेल घोटाळा चौकाशीची मागणी केली शिवाय उद्योगपती अनिल अंबानी यांना लाभ पोहचविल्याचा आरोप केला असून देशाचा चौकीदार चोर असल्याचे म्हटले आहे.. हाच मुद्दा भाजपने कॅश करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जाणकार बोलू लागले आहे. चौकीदार हा भाजप व मित्रपक्षांना पुन्हा एकदा केंद्रात सत्ता मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरेल असे भाजप नेत्यांना वाटत असल्यामुळे विकासाचे मुद्दे बाजूला ठेऊन मी चौकीदार म्हणत सर्व सामान्य मतदारांच्या मनात शिरण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. देशात शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, आरक्षण, या परराष्ट्रीय धोरण, भारत पाकिस्थान आदि अनेक ज्वलंत मुद्दे बाजूला आहेत राजकारणात चाणक्य असलेल्या नरेंद्र मोदीसह सत्ताधारी नेते देशाच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करून एअर सर्जिकल स्ट्राईक, भारत पाकिस्थान आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या सुरक्षा संबंधी असलेले प्रश्न सोडवण्याची कुवक आमच्यात असल्याचे दाखवीत आहे. देशात असलेले सर्वच राजकीय पक्ष सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रचाराला सामोरे जात आहे.त आरोप-प्रत्यारोपाच्या फेरी सुरू झाल्या आहे.त जो-तो देशाचा हितचिंतक असल्याचे दाखवीत आहे. विकासाच्या मुद्यासोबत कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, नौकरी, सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी रोजगार, आरक्षण यासह बुलेट, मेट्रो ट्रेन आदि अनेक घोषणा लोकसभा निवडणुकी दरम्यान घोषणा पत्रात असण्याची शक्यता आहे., पूर्वी निवडणुका दरम्यान विकासात्मक मुद्देच महत्वाचे होते मात्र आता चायवाला, चौकीदार आदि मुद्दे बघायला मिळत आहे.. पूर्वी शिक्षण व्यवस्था कमकुवत होती मात्र आज काळ बदलला आहे.. देशात जवळपास सर्वच साक्षर झाले आहे.त. त्यामुळे आजच्या मतदारांना कोणते विकासाचे मुद्दे याची जाणीव आहे..



दलित वंचित आघाडीची भूमिका निर्णायक?
दलित वंचित आघाडीत लाखो करोडो उच्च शिक्षित जाणकार मतदार आहे. हे या सर्व मतदारांवर सत्ताधारी राजकीय पक्षासह राजकीय नेत्यांचा डोळा आहे.. हे सर्व मतदार योग्य वेळी आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.त. येणाऱ्या 17 व्या लोकसभा निवडणुकीत दलित वंचित आघाडी सोबत सोशल मीडियाची भूमिका सुद्धा निर्णायक राहणार असणार यात दुमत नाही.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.