Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च १८, २०१९

पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज नाही

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 
विविध पक्षाकडून 11 अर्जाची मागणी


चंद्रपूरदि.18 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी चंद्रपूर मतदारसंघांमध्ये 11 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची सुरुवात आज दिनांक 18 मार्चपासून सुरू झाली आहे. आज एकही अर्ज दाखल झाला नाही.
आज एकही अर्ज दाखल झाला नसला तरी विविध पक्ष व अपक्षांनामार्फत 11 नामनिर्देशन पत्राची मागणी करण्यात आली. यामध्ये अपक्ष प्रबुद्धअंबिकाप्रसाद शांतीलाल दवे 1 अर्ज ), भारतीय मायनॉरिटी सुरक्षा महासंघतर्फे रवींद्र विलीयम केदारी (1 अर्ज ), नेताजी सुभाष चंद्र बोस सामाजिक समिती अपक्षतर्फे आशिक हुसेन शेख कादीर शेख (1 अर्ज ), प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीतर्फे उत्तम भगाजी कुंबळे ( 2 अर्ज )अपक्ष अरवींद नानाजी राऊत ( 3 अर्ज ), अमोल वामन मुंगूले ( 1 अर्ज )मिलिंद प्रल्हाद दहिवले ( 2 अर्ज ) या आज मागणी केलेल्या अकरा नामनिर्देशन पत्राचा समावेश आहे.
लोकसभा मतदारसंघातून लोकसभेसाठी होणाऱ्या निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्रे दिनांक 18 मार्च 2019 ते 25 मार्च 2019 पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रपूर मतदार संघ तथा जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे दाखल करता येणार आहे.
        
  उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत आहे. 18 मार्च ते 25 मार्च या काळातील सार्वजनिक सुट्ट्या व्यतिरिक्त शासकीय कामकाजाच्या दिवशीच हा अर्ज दाखल करता येईल.
 नामनिर्देशन पत्रांची छाननी 26 मार्च रोजी सकाळी 11 वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे सुरू करण्यात येईल. ज्या उमेदवारांना आपले अर्ज मागे घ्यायचे असेल त्यांना 28 मार्च 2019 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातच अर्ज सादर करता येईल. 11 एप्रिल रोजी निवडणूक घ्यायची झाल्यास सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईलअशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी संपत खलाटे यांनी दिली आहे.    

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.