Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, एप्रिल २९, २०१४

नायब तहसीलदार एसीबीच्या जाळय़ात

कोरपना -
स्वस्त धान्य व शेत फेरफारात गोरगरीब धान्य दुकानदार अन् शेतकर्‍यांकडून लूट करणार्‍या येथील महसूल विभागाची मोठी कडी वर्धा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी तोडली. शेतीचा फेरफार करण्यासाठी गरीब शेतकर्‍याला तब्बल २ लाख रुपयांची लाच मागून त्रास देणार्‍या कोरपना येतील नायब तहसीलदार माने यांना ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली. मागील वर्षात चंद्रपूर येथील तहसीलदारालाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते.

येथील तहसील कार्यालयात कार्यरत नायब तहसीलदार माने हे अनेक दिवसांपासून शेतीपयोगी कामासाठी येणार्‍या बर्‍याच शेतकर्‍यांकडून लाच स्वीकारल्याशिवाय कागद टेबलावरून सरकवत नव्हते. अशी ओरड तालुक्यातील शेतकर्‍यांकडून वारंवार होत असे. एका कामासाठी तालुक्यातील ग्रामीण भागातून येणार्‍या शेतकर्‍यांना बर्‍याच हेलपाट्या मारूनही काम होत नव्हते. तालुक्यातील शेरज हेटी येथील रहिवासी मिराबाई डोलकर यांच्या शेतातील शेत सर्व्हे क्र. १0६ आराजी २.९७ चा वाद राजुरा येथील दिवाणी न्यायालयात सुरू होता. या शेतीच्या वादाचा निकाल मिराबाई डोलकर यांच्या बाजूने लागला. न्यायालयाच्या आदेशानुसार सदर शेतीचा फेरफार करण्यासाठी मिराबाई यांचे पुतणे अरविंद डोलकर यांनी नायब तहसीलदार माने यांच्याकडे काही दिवसांपूर्वी अर्ज सादर केला. अर्ज सादर करून बरेच दिवस लोटल्यानंतरही डोलकर कुटुंबीयांचा कागद टेबलावरून सरकलाच नाही. ल्ल




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.