Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मार्च १९, २०१९

चंद्रपूरात अन्नदात्यांसाठी किसानपुत्राचे अन्नत्याग


चंद्रपूर
: शेतकरी मानसिकदृष्ट्या हतबल झाला आहे. शासन, प्रशासनाकडून तो नागविला जात आहे. त्यांच्यामुळे त्यांच्या पाठीशी उभी राहण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. त्यामुळे अन्नत्याग आंदोलनाचे महत्त्व आहे. शेतक-याला मानसिक आधार देण्याचा हा किसानपुत्राचा छोटासा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केले.
राज्यातील पहिल्या शेतकरी आत्महत्येच्या ३३ व्या स्मृतिदिनानिमित्त किसानपुत्र फाऊंडेशनतर्फे अन्नदात्यांसाठी अन्नत्याग आंदोलन मंगळवारी (ता. १९) करण्यात आले. सायंकाळी साडेपाच वाजता गांधी चौकात नींबू पाणी पाजून आंदोलनाची सांगता झाली. याप्रसंगी किसानपुत्र फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा. विजय बदखल, बळीराज धोटे, हिराचंद बोरकुटे, उमाकांत धोटे, नगरसेवक पप्पू देशमुख, राजू झोडे, बंडू धोत्रे, राजू कुकडे, प्रा . सुरेश विधाते, प्रा . सुरेश चोपणे, नंदकिशोर मुसळे, नगरसेवक सचिन भोयर, नरेंद्र बोबडे, नितीन बनसोड, डॉ. इश्वर कुरेकर, अनिल पेटकर, निलेश बेलखेडे, प्रदीप उमरे, पंकज चिंतालवार, प्राचार्य पायपरे, प्रा. सुरेश चोपणे, रवींद्र झाडे, भाविक येरगुडे, सुरेश विधाते, सुधीर पोडे, नीलेश पाऊणकर, जितेंद्र मशारकर, गणेश पाचभाई, हितेश गोहकर, मयूर राईकवॉर, प्रमोद उरकुडे, विलास माधानकार, संतोष ताजने, मनोज साळवे, भूषण महाकुलकर, किशन नागरकर, घनश्याम येरगुडे, सतीश मालेकर, सुजित मंडळ, प्रकाश कामडे, यांची उपस्थिती होती.
यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी १९ मार्च १९८६ ला सामूहीक आत्महत्या केली. राज्यातील ही पहिली अधिकृत शेतकरी आत्महत्या. त्यानंतर आजतागायत लाखो शेतक-यांनी गळफास लावून घेतला. शेतक-यांच्या आत्महत्या वाढत आहेत. धोरणकर्ते शेतक-यांचे ऐकत नाही. त्यामुळे आता शेतक-यांच्या पाठीशी शेतकरीपुत्र आणि पुत्रींना उभे राहण्यासाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. कामाच्या ठिकाणावरून राहून अनेकांनी दिवसभर उपवास करून आत्महत्याग्रस्ह शेतक-यांना आदरांजली आणि त्यांच्याप्रति सहवेदना व्यक्त केली. प्रास्ताविक किसानपुत्र फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. विजय बदखल यांनी केले. संचालन जयंत देठे यांनी, तर आभार अनिल डहाके यांनी मानले.
या आंदोलनाला किसानपुत्र फाउंडेशन, भूमिपुत्र युवा एकता बहु. संस्था, मनोवेध सांस्कृतिक प्रतिष्ठान, जन विकास सेना, युथ चांदा ब्रिगेड, बीआरएसपी., इको-प्रो, मराठा सेवा संघ, स्वाभिमानी कुणबी संघटना, धर्मराज्य पक्ष, ग्रीन प्लॅनेट सोसायटी, सावित्रीबाई ङ्कुले ज्ञानदीप बहुउद्देशीय संस्था, युथ ऑफ चांदा वाल्मिकी मछुआ सहकारी संस्था, ग्रीन प्लॅनेट सोसायटी, प्रहार आणि चंद्रपूर बचाव संघर्ष समिती, किसान क्रांती समन्वयक समिती राजुरा, qबग डिझायर क्लब चंद्रपूर, महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीचे सदस्य सहभागी झाले होते.
अन्नत्याग आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिबा

किसानपुत्र फाउंडेशन, भूमिपुत्र युवा एकता बहु. संस्था, मनोवेध सांस्कृतिक प्रतिष्ठान, जन विकास सेना, युथ चांदा ब्रिगेड, बीआरएसपी., इको-प्रो, मराठा सेवा संघ, स्वाभिमानी कुणबी संघटना, धर्मराज्य पक्ष, ग्रीन प्लॅनेट सोसायटी, सावित्रीबाई ङ्कुले ज्ञानदीप बहुउद्देशीय संस्था, युथ ऑफ चांदा वाल्मिकी मछुआ सहकारी संस्था, ग्रीन प्लॅनेट सोसायटी, चंद्रपूर बचाव संघर्ष समिती, किसान क्रांती समन्वयक समिती राजुरा, qबग डिझायर क्लब चंद्रपूर, महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.