Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मार्च १९, २०१९

लोकशाहीच्या बळकटीसाठी यंदा नारीशक्ती निर्णायक ठरणार



“स्वीप” कार्यक्रमातून महिला मतदारांमध्ये जनजागृती
चंद्रपूर, दि.19 मार्च- महाराष्ट्रात चार टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य ठरविण्यात यंदा महिला मतदारांचा महत्वाचा वाटा यापूर्वीच्या आकडेवारीवरून 2004, 2009 आणि 2014 च्या तुलनेमध्ये महिला मतदारांचा टक्का वाढला आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्येही हा टक्का वाढला असून यावर्षी जिल्ह्यातील एकूण 9 लाख 12 हजार महिला मतदारांपैकी 80 हजार महिला प्रथमच मतदान करणार आहेत.

2004 मध्ये पुरुष आणि महिला मतदार अशी स्वतंत्र नोंदणी करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे त्यावर्षी एकूण 3 कोटी 42 लाख 63 हजार 317 मतदारांची नोंदणी राज्यात झाली होती. 2009 आणि 2014 या दोन्ही लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा कमी होती. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीत महिला मतदारांची संख्या वाढली आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार 1 हजार पुरुषांमागे 924 महिला असे प्रमाण होते. सन 2014 मध्ये मतदार यादीतील महिलांचे प्रमाण 1 हजार पुरुषांमागे 889 महिला इतके होते. आता मात्र सन 2019 मध्ये 1 हजार पुरुषांमागे 911 महिला अशी लक्षणीय सुधारणा झाली आहे.

यात चंद्रपूर लोकसभा मतदार क्षेत्रातील महिलाही मागे नाहीत. आगामी निवडणुकीत 9 लाख 89 हजार पुरुष मतदार तर 9 लाख 12 हजार महिला मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. पुरुष मतदाराच्या तुलनेत महिला मतदाराची संख्या कमी दिसत असली तरी 2014 लोकसभा मतदान नोंदणीच्या तुलनेत 2019 च्या नोंदणीमध्ये महिलांनी बाजी मारली आहे. 31 जानेवारी 2019 पर्यंत 69 हजार पुरुषांनी नोंदणी केली तर महिलांनी बाजी मारत तब्बल 80 हजार 187 नवमतदारांनी नोंदणी करून समानता जोपासणाऱ्या सशक्त लोकशाही दर्शन घडवले आहे.

महिला मतदार जागृतीसाठी भारत निवडणूक आयोगाच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्हा प्रशासन, “स्‍वीप” (SVEEP - Systematic Voters Education and Elector Participation)कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित आहे. महिला मतदारांची संख्या वाढविणे हा या अभियानाचा महत्वाचा घटक आहे. त्यासाठी अंगणवाडीसेविका, आशा कर्मचारी, परिचारिका, महिला बचत गट, अशासकीय संस्‍था आदींचे सहकार्य महिला मतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी घेण्यात येत आहे. शिवाय उद्योग, शिक्षण, सामाजिक, साहित्य, कला-संस्कृती यासह विविध क्षेत्रातील अग्रणी महिलांच्‍या माध्‍यमातून महिलांना मतदार नोंदणीसाठी प्रोत्‍साहित करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात 2004 च्या लोकसभा निवडणुकीसाठी 3 कोटी 42 लाख 63 हजार 317 एकूण मतदार होते. 2009 लोकसभा निवडणुकीत एकूण 7 कोटी 29 लाख 54 हजार 58 मतदार होते. यामध्ये 3 कोटी 81 लाख 60 हजार 162 पुरुष मतदार आणि 3 कोटी 47 लाख 93 हजार 896 महिला मतदारांचा समावेश होता. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत 2 कोटी 4 लाख 78 हजार 932 पुरुष मतदारांनी तर 1 कोटी 64 लाख 87 हजार 190 महिला मतदारांनी नाव नोंदवले. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी एकूण 8 कोटी 7 लाख 98 हजार 823 मतदारांनी नोंदणी केली. यामध्ये 2 कोटी 66 लाख 22 हजार 180 पुरुष मतदार होते तर 2 कोटी 20 लाख 46 हजार 720 महिला मतदार होते. आता 2019 मध्ये 8 कोटी 73 लाख 30 हजार 484 एकूण मतदार असल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये 4 कोटी 57 लाख 2 हजार589 पुरुष मतदार आहेत. तर 4 कोटी 16 लाख 25 हजार 819 महिला मतदार आहेत.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात सुध्दा 2014 च्या तुलनेत महिला मतदारांची लक्षणीय वाढ दिसून आली. 2014 मध्ये महिला मतदाराची संख्या 8 लाख 32 हजार होती तर त्यात वाढ होऊन ती आता 9 लाख 12 हजार महिला मतदारांनी नोंदणी केली. ज्या महिला वर्गाने उत्स्पुर्तपणे मतदान नोंदणी केली त्याच उत्साहाने मतदान प्रक्रियेत भाग घेऊन लोकशाही बळकट करण्यास समोर यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी जिल्ह्यातील महिलांना केले आहे.


नोडल अधिकारी लागले कामाला प्रशासन निवडणूक कामकाजाचा प्रभाव
चंद्रपुर, दि.18 : भारत निवडणूक आयोग यांच्या आदेशानुसार सन 2019 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूक घोषित झालेली आहे. चंद्रपुर लोकसभा मतदार संघाची निवडणुक येत्या 11 एप्रिल रोजी आहे. त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्हा स्तरावर निवडणूकीच्या कामकाजासाठी समन्वय अधिकारी(NODALOFFICER) म्हणून विविध अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. चंद्रपूर जिल्हयातील लोकसभा मतदार संघ अंतर्गत त्यांना प्रत्यक्ष कामकाज करावयाचे आहे. नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी आपआली नेमून दिलेली कामे प्राधाण्याने करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांनी दिले.

नियुक्त केलेले समन्वय अधिकारी व असलेल्या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे आहेत.

निवडणूक संनियंत्रण आणि आचारसंहिता अतिरीक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट आणि कायदा व सुव्यवस्था निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भूगावकर, मतदान कर्मचारी व्यवस्थापन नियोजन अधिकारी (चांदा बांदा) सुनील धोंगळे, प्रशिक्षण व्यवस्थापन जिल्हा व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी एस. आर. बुजाडे, वाहतूक व्यवस्थापन, जिल्हा परिवहन अधिकारी व्ही. एन. शिंदे, मुद्रणालय सहाय्यक संचालक बी.जी. येरमे, निवडणूक खर्च मुख्य लेखा व वित्त अधिकारी अशोक माटकर, माध्यम प्रमाणीकरण आणि देखरेख जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, संगणक कक्ष आणि डेटाबेस जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सतीश खडसे, माहिती व्यवस्थापन व स्विप शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डी.पी.लोखंडे, हेल्पलाइन व तक्रार निवारण जिल्हा नियोजन अधिकारी जी.आर. वायाळ, एस.एम.एस. सुविधा उपजिल्हाधिकारी (भू-संपादन) कल्पना निळ-ठुबे, मतदान केंद्रावरील सुविधाकार्यकारी अभियंता जिल्हा परिषद नरेंद्र बुरांडे, दिव्यांगांसाठी सुविधा जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील जाधव, पोलीस व्यवस्थापनासाठी सुविधा जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे.

संबंधित अधिकाऱ्यांनी निवडणुक आयोग व जिल्हा प्रशासनामार्फत प्रत्येक विषयाबाबत वेळोवेळी आलेल्या सूचना व आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.