Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, एप्रिल ०९, २०१९

पारोमिता गोस्वामींच्या भूमिकेने चंद्रपुरात रणकंदन

मूल- लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला असून निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांमध्ये आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी चांगल्याच झडू लागल्या आहेत. श्रमिक एल्गारचा पारोमिता गोस्वामींनी घेतलेल्या भुमिकेवर मूल तालुक्यातही चांगलेच रणकंदन माजले आहे. 

गोस्वामींची भुमिका कशी योग्य की अयोग्य यावर समर्थक-विरोधक आपआपले तर्क सांगतांना दिसुन येतात. संपुर्ण देशभरात विकास,जातियवाद,दहशतवाद आदी विवीध मुददयांवर निवडणुकीचा प्रचार सुरू असतांना चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात मात्र दारू विकणारा उमेदवार या विषयावरून वेगळेच वातावरण तापु लागले आहे. श्रमि​क एल्गारचा पारोमिता गोस्वामी यांनी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिलेल्या बाळु उर्फ सुरेश धानोरकर यांच्या विरोध म्हणुन भाजपाचे उमेदवार हंसराज अहिर यांना संघटनेचा पाठींबा जाहीर केला. गोस्वामींचा पाठींबा बॉंब ने या क्षेत्रातील निवडणुक प्रचाराचे चित्रच बदलवुन टाकले आहे. बेरोजगारी,प्रदुषण,शेतकयांचे प्रश्न,सिंचन सुविधा अशा जिल्हयातील ईतर विषयांना यानिमित्ता तिलांजली दिल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. केवळ आणि केवळ दारू वाला उमेदवार या एकाच मुद्द्या भोवती जिल्हयातील निवडणुकीचे प्रचार फिरत आहे. गोस्वामी यांच्या दारूबंदीचा विषय कितपत प्रभावी ठरला हे जिल्हयातील जनतेने मागील पाच वर्षात पाहीले आहे. त्यानंतरही त्यांच्या दारूबंदीचा आग्रह संघटनेची भुमिका म्हणुन मान्य करता येईल परंतु ऐन निवडणुकीत हा मुददा उपस्थीत करून त्या सर्वांनांच वेठीस धरीत आहे. दारूबंदी आणि त्याची अंमलबजावणी हा शासन यंत्रणेशी निगडीत विषय असुन निवडणुकीनंतर सत्तेवर येणाऱ्याकडे विवीध विधायक मार्गाने पाठपुरावा करून तो मान्य करून घेणे अपेक्षीत आहे. परंतु पारोमिता गोस्वामी तसे करतांना दिसत नाही. देशाचा राज्यघटनेने प्रत्येक नागरीकाला स्वतंत्रपणे मतदानाचा अधिकार दिलेला आहे. मतदान ही व्यक्तीगत बाब आहे. कुणी कुणाला मतदान करावे हा ज्याचा त्याचा भाग आहे. यात जर तर चा उल्लेख केल्यास तो व्यवहार ठरतो. सौदेवाजी करून मतदानाला प्रेरीत करणे एकप्रकारे घटनाबाहय आहे. सभासदांना ग्रूहीत धरून संघटनेने ऐन निवडणुकीत राजकीय पक्षाला किंवा त्याचा उमेदवाराला एखादा मुददा अथवा संघटनेची मागणी मान्य करून घेण्यास बाध्य करणे आणि त्यातुन मान्य करणाऱ्याला समर्थन आणि पर्यायाने ईतरांना विरोध करणे म्हणजे संधटनेचा सभासदाचा व्यक्तिगत अधिकारावर घाला घालणे अशी जनमाणसांत चर्चा रंगु लागली आहे. पारोमिता गोस्वामी यांच्या दारूवाला उमेदवार नको या धोरणाचा या निवडणुकीत काय परीणाम होतो हे तर 23 मे चा निकालात कळणारच आहे. मात्र, गोस्वामी यांच्या भुमिकेवरून त्यांच्या बददल एकप्रकारे सांशकाचे वातावरण निर्माण होवु लागले. 


✒खबरबातसाठी रमेश माहूरपवार,मूल


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.