-अश्विन मुदगल
* निवडणुकीसंदर्भातील सर्व प्रशिक्षणाला उपस्थिती अनिवार्य
* नकार देणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल
नागपूर, दि. 24 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागपूर व रामटेक मतदार संघातील मतदानासाठी पहिल्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. या प्रशिक्षणाला अनुपस्थित असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना शो-कॉज नोटीस देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी दिल्यात.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात लोकसभा निवडणुकीसंदर्भात विविध विभागांचा आढावा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी घेतला. निवडणुकीसाठी पहिल्या प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आल्यामुळे अशा सर्व कर्मचाऱ्यांविरुद्ध तात्काळ कारवाई करावी, असे निर्देशही यावेळी त्यांनी दिलेत.
यावेळी रामटेक लोकसभा मतदार संघाचे निवडणूक अधिकारी श्रीकांत फडके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा, नोडल अधिकारी अविनाश कातडे, उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी रविंद्र कुंभारे, अन्नधान्य वितरण अधिकारी- वार्डेकर, सहसंचालक लेखा मोना ठाकूर आदी निवडणुकीसंदर्भातील विविध शाखांचे प्रमुख, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यावेळी उपस्थित होते.
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता आहे. तसेच मतदानासाठी व्हीव्हीपॅटचा वापर होत असल्यामुळे अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध होणे गरजेचे असल्यामुळे जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघनिहाय विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती निवडणूक कामासाठी करण्यात आली आहे. यासाठी पहिले प्रशिक्षण अनिवार्य असून या प्रशिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांनी अनुपस्थिती नोंदविली असल्यामुळे अनुपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शो-कॉज नोटीस देण्याच्या सूचना बैठकीत जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिल्यात.
जिल्ह्यात मतदान केंद्रनिहाय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येणार असून नागपूर व रामटेक लोकसभा मतदार केंद्रामध्ये मतदान केंद्रनिहाय सुमारे 21 हजार 912 अधिकारी व कर्मचारी तसेच ओपीओ म्हणून 10 हजार 956 अधिकारी व कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. त्याप्रमाणे अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आले आहे.
रामटेक लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघनिहाय 11 हजार 724 अधिकारी व कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. तसेच 5 हजार 862 अदर पोलिंग ऑफिसरची नियुक्ती करण्यात येणार आहे. नागपूर लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघनिहाय निवडणुकीसाठी 10 हजार 188 अधिकारी व कर्मचारी तसेच 5 हजार 94 अदर पोलिंग ऑफिसरच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
रामटेक लोकसभा मतदार संघासाठी आवश्चक मनुष्यबळ
अ. क्र.
|
विधानसभा मतदार संघ
|
मतदान केंद्र
|
आवश्यक मनुष्यबळ
|
अदर पोलिंग ऑफिसर
|
1
|
48-काटोल
|
328
|
1,640
|
820
|
2
|
49-सावनेर
|
364
|
1,820
|
910
|
3
|
50-हिंगणा
|
433
|
2,164
|
1,082
|
4
|
51-उमरेड
|
383
|
1,916
|
958
|
5
|
58-कामठी
|
480
|
2,400
|
1,200
|
6
|
59-रामटेक
|
357
|
1,740
|
892
|
एकूण
|
2,345
|
11,724
|
5,862
|
नागपूर लोकसभा मतदार संघासाठी आवश्चक मनुष्यबळ
अ. क्र.
|
विधानसभा मतदार संघ
|
मतदान केंद्र
|
आवश्यक मनुष्यबळ
|
अदर पोलिंग ऑफिसर
|
1
|
52-दक्षिण
|
372
|
1,860
|
930
|
2
|
53-दक्षिण-पश्चिम
|
344
|
1,720
|
860
|
3
|
54-पूर्व
|
334
|
1,672
|
836
|
4
|
55-मध्य
|
305
|
1,524
|
762
|
5
|
56-पश्चिम
|
331
|
1,656
|
827
|
6
|
57-उत्तर
|
351
|
1,756
|
878
|
एकूण
|
2,037
|
10,188
|
5,094
|