- वानेरी या गावातील घटणा
- सहा बकऱ्या ठार
प्रशांत गेडाम/सिंदेवाही
सिंदेवाही तालुक्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतर्गत येणारे वानेरी या गावात रात्री दोन वाजता सुमारास बिबट्याने रामदास अगडे या शेतकऱ्याच्या राहत्या घरी लागुनच बाजूला असलेल्या गोठ्यात बिबट (वाघ) बकऱ्या वर हल्ला करुन 6 बकऱ्या जागीच ठार केल्या. व त्या परिसरातून बिबट्या पळून गेला. ही माहिती मिळताच सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी गोंड साहेब(RFO ), व फॉरेस्ट अधिकारी यांनी घटनास्थळी पाहणी केली. गावात त्वरित बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावुन जेरबंद करु अशी गावातल्या नागरिकांशी चर्चा केली. तरी, वानेरी या गावात व परिसरात भीतीचे वातावरण असुन त्वरित बंदोबस्त करावा. व बिबट्याला जेरबंद करावा अशी गावातील नागरिकांची मागणी आहे