Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मार्च २४, २०१९

वाघाच्या हल्यात शेतकरी बचावला


फटाकाच्या आतषबाजीने वाघाला जंगलाच्या दिशेने पलायन करण्याचा प्रयत्न

चिमूर/रोहित रामटेके
           
चिमूर:- चिमुर तालुक्यातील  मासळ (बु) येथुन जवळ असलेल्या मानेमोहाळी येथिल झित्रुबाई देवस्थान जवळ नेहमी प्रमाने दि २३/०३/२०१९ ला शेतात शेतकरी सुभाष करारे मोटारपंप बंद करण्याकरीता गेल्या असता पट्टेदार वाघाने हल्ला केला परंतु सुदैवाने या हल्यात शेतकरी सुभाष करारे थोडक्यात बचावला.
            नेरी वनपरिक्षेत्र कार्यालया अंतर्गत येत असलेल्या माने मोहाळी जवळ शीत्रुबाई देवस्थान जवळ सुभाष करारे यांचे शेत असुन नेहमी प्रमाने दि २३/०३/२०१९ ला सकाळी ७ वाजताच्या सुमारास शेतात मोटारपंप बंद करण्यासाठी शेतात गेले असता पट्टेदार वाघाने सुभाष करारे यांच्यावर झडप घेतली. परंतु मधेच काट्याचे झुडुप असल्याने वाघ त्या काट्याच्या झाडाला अडकल्यामुळे तीथुन शेतकऱ्याने पळ काढला त्यामुळे त्याचे प्राण थोडक्यात वाचले. त्यानंतर वाघाने बाजुला दबा धरून बसला. त्यानंतर आजु बाजुचा गावातील नागरीक व परीसरातील नागरीक पटेदार वाघ बघण्यासाठी एकच गर्दी करू लागले, घटणा स्थळी जत्रेचा स्वरुप दिसुन आले
     नेरी वनपरिक्षेत्र कार्यालयाला फोन करून माहिती दिली असता वनपरिक्षेत्र कार्यालयातील कर्मचारी उशीरा घटना स्थळावर दाखल झाले.   पर्यत घटना स्थळावर जमाव बघुन वन विभागाने जमावाला शांत करण्याच्या दृष्टीने चिमूर पोलीस विभागाला पाचारण करण्यात आले. 
   वनविभाग वाघाला बेशुद्ध करून पकडून जंगलात सोडावेत अशी शेतकऱ्यांची मागणी होती. परंतु वनविभागाने ते काही न ऐकता घटनास्थळावर फटाक्याची आतिषबाजी करुन वाघाला जंगलाच्या दिशीने पळविण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र वाघ अजुन पर्यत घटना स्थळावर दबा धरून  बसुन आहे. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरलेले आहे.
वन विभागाचे अक्षम दुर्लक्ष माने मोहाळी परिसरात वाघ निघल्याची माहिती वनविभागाला देण्यात आली होती. परंतु वन विभागाचे कर्मचारी तब्बल ४ तास उशीरा घटना स्थळावर दाखल झाले. व वनविभाग लोकांच्या सुरक्षतेची कोणतेही काळजी घेत नसुन रेशकुऑपरेशन च्या नावाखाली फक्त फटाक्याची आतीषबाजी करीत असून यामुळे कोणतेही जीवीत हानी होऊ नये म्हणून वनविभाग याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरीक करीत आहेत. . ..........................

पट्टेदार वाघ पाहण्याकरीता परीसरातील नागरीकांची गर्दी ला जनु जत्रेचा स्वरुप मिळाला त्यामध्ये, चाय,कच्चा चिवडा, खर्रा, आईसक्रीम, चे चालता बोलता दुकाने सजले.
..........................................
पटेदार वाघाला पाहण्याकरीता व भेट देण्याकरीता चिमुर चे उपविभागीय अधिकारी भैय्यासाहेब बेहेरे तहसिलदार संजय नागटिळक, जि.प.सदस्य गजानन बुटके, प. स. उपसभापती शांताराम सेलवटकर,आशिफ शेख आदी उपस्थित होते
.................................
वनविभागाला मागील २ महिण्यापासून वाघ राहत असल्याची मी माहिती देत होतो परंतु वन विभाग याकडे नेहमी दुर्लक्ष करीत होते. वन विभाग सुरक्षेच्या दुष्टीकोनातुन  काहीही करीत नसून यामुळे कोणतेही जीवीत हानी झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार वन विभाग राहील.
     सुभाष करारे
      शेतकरी

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.