Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मार्च २४, २०१९

आदित्यच्या उपस्थितीत शिवजन्मस्थानी शिवजयंती

जुन्नर /आनंद कांबळे 

 तिथीप्रमाणे फाल्गुन वद्य तृतियेस साजरा होणारा शिवजयंती सोहळा २३ मार्च रोजी पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे  यांच्या उपस्थितित साजरा करण्यात आला. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे  यांच्या समवेत खासदार शिवाजीराव आढळराव पाटिल, अनिल देसाई,  आमदार शरद सोनवणे यांनी किल्ले शिवनेरीवर छत्रपति शिवरायांना अभिवादन केले.   
      युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे  यांनी  सकल जनांचे आराध्य दैवत छत्रपति शिवरायांना वंदन  करन लोकसभा निवडणुकांसाठी आशीर्वाद घेण्यासाठी शिवजन्मस्थळी आल्याचे  मोजक्या शब्दात सांगितले. 
      शिवसेना जिल्हाप्रमुख राम गावडे, जिल्हा समन्वयक संभाजी  तांबे,  युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत गाडे , गुलाब पारखे, तालुका प्रमुख माऊली  खंडागळे, भाजपा तालुका अध्यक्ष भगवान घोलप, नगराध्यक्ष शाम  पांडे, नगरसेवक समीर भगत, दीपेश परदेशी, अविनाश करडिले, नगरसेविका सुवर्ण बनकर, अंकिता  गोसावी, शिवनेरी स्मारक समितीचे कार्याध्यक्ष मधुकर  पांडुरंग काजळे, शहरप्रमुख शिवा खत्री, भाजपा शहराध्यक्ष नंदू  तांबोळी, हेमंत मावळे, गडसंवर्धन समितीचे सदस्य श्रमिक गोजमगुंडे, शिवव्याख्याते पराग  ठाकुर,  शिवसेना, भा. ज. पा. चे तालुका व जिल्हयातील पदाधिकारी उपस्थित होते. 
  शिवजन्मोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन  करण्यात आले असल्याची माहिती शिवनेरी स्मारक समितीचे कार्याध्यक्ष मधुकर  पांडुरंग काजळे यांनी दिली.  
गुरुवार दि.२१ रोजी सायंकाळी  शिवजन्मस्थानी सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेच्या वतीने दिपोत्सवाचे  तसेच दि. २२ रोजी गडप्रदक्षिणेचे आयोजन करण्यात आले होते.आश्रमशाळेच्या विद्यार्थि यांनी बजने सादर केली. आज सकाळी शिवजयंतीदिनी सकाळी ७ वाजता सौ. श्रीजा व श्रमिक गोजमगुंडे यांच्या हस्ते शिवाई देवीस अभिषेक करण्यात आला. त्यानंतर छबिना पालखी मिरवणुक वाजत गाजत शिवाई देवी मंदिरापासून  शिवजन्मस्थळापर्यंत काढण्यात आली .शिवजन्म स्थानी पारंपरिक पाळणा म्हणून शिवजन्म सोहळा संपन्न झाला. त्यानंतर ध्वजारोहण व पोवाड्यांचा  कार्यक्रम  झाला.तसेच जाहिर धर्मसभा व ह. भ. प. डॉ.मोहिनी विठ्ठल पाबळे यांना यावर्षाचा राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान करण्यात आला. १२ वाजता पायथ्याशी  महाप्रसादाचे आयोजन केले  होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.