Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

जुन्नर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जुन्नर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, डिसेंबर २१, २०२२

बोगस आदिवासी प्रश्नी जुन्नर मध्ये राज्यस्तरीय एल्गार परिषद | Elgar Parishad in Junnar on bogus tribal question

बोगस आदिवासी प्रश्नी जुन्नर मध्ये राज्यस्तरीय एल्गार परिषद | Elgar Parishad in Junnar on bogus tribal question

बोगस आदिवासी प्रश्नी जुन्नर मध्ये राज्यस्तरीय एल्गार परिषद

बोगस आदिवासी प्रश्नी जुन्नर मध्ये राज्यस्तरीय एल्गार परिषद
बोगस आदिवासी प्रश्नी जुन्नर मध्ये राज्यस्तरीय एल्गार परिषद


जुन्नर /आनंद कांबळे

: आदिवासींचे खोटे जमात प्रमाणपत्र सादर करून अनेकांनी सरकारी नोकऱ्या बळकावलेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अशा लोकांची नोकरीतून हकालपट्टी करणे आवश्यक आहे. ज्या खऱ्या आदिवासींसाठी संविधानाने आरक्षण दिलेले आहे, त्यांना त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेऊन त्या जागा बळकावणे म्हणजे संविधानाच्या प्रती गुन्हा आहे. कोणतेही सरकार एखादा शासन निर्णय किंवा परिपत्रक काढून अशा बोगस व्यक्तींना संरक्षण देऊ शकत नाही असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे नोंदविले आहे. असे असूनही राज्यात अशा बोगस आदिवासींना संरक्षण देणारा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, जनवादी महिला संघटना, सिटू, डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया व स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया, सरकारच्या, या कृतीचा धिक्कार करत आहे. या निर्णयाविरोधात नवीन कांदा मार्केट, जुन्नर येथे दिनांक 23 डिसेंबर 02022 रोजी भव्य राज्यस्तरीय एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव गणपत घोडे व किसान सभेचे जिल्हा सचिव विश्वनाथ निगळे यांनी दिली.

या परिषदेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू चे आमदार विनोद निकोले, किसान सभेचे नेते माजी आमदार जे. पी. गावीत, माकपचे राज्य सरचिटणीस डॉ. उदय नारकर, किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले, तलासरी नगरपंचायत चे सभापती नंदकुमार हडाळ, सुरगाणा पंचायत समिती माजी सभापती इंद्रजित गावित, माकपचे जिल्हा सचिव गणेश दराडे, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे राज्य अध्यक्ष सोमनाथ निर्मळ, आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाचे संजय साबळे आदींसह उपस्थित रहाणार आहेत.

राज्यात समोर आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात १२,५०० पदांवर बोगस लोकांना आदिवासी आरक्षणाचा लाभ देण्यात आला आहे. संघटनांनी व जागरूक नागरिकांनी आवाज उठविल्यानंतर यापैकी केवळ ३,०४३ पदे रिक्त करण्यात आली आहेत. रिक्त केलेल्या या पदांपैकी केवळ ६१ पदे भरण्यात आलेली आहेत. उर्वरित ९,४५७ पदे रिक्त करून ही पदे खऱ्या आदिवासींमधून भरण्याबाबत निर्णय शासनाकडून त्वरित घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. राज्यव्यापी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी ही परिषद होत असून राज्यभरातून मोठ्या संख्येने प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

बुधवार, डिसेंबर १४, २०२२

जुन्नर बिबट सफारीचा सविस्तर प्रकल्प अहवाल 15 फेब्रुवारीपर्यंत तयार करा

जुन्नर बिबट सफारीचा सविस्तर प्रकल्प अहवाल 15 फेब्रुवारीपर्यंत तयार करा

जुन्नर बिबट सफारीचा सविस्तर प्रकल्प अहवाल 15 फेब्रुवारीपर्यंत तयार करावा



-वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई |   जुन्नर तालुक्यात होणारा बिबट सफारी प्रोजेक्ट स्थानिक पर्यटन आणि रोजगाराला चालना देणारा असावा. त्यादृष्टीनेच या प्रकल्पाची आखणी व्हावी. येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत त्यासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा, असे निर्देश राज्याचे वने, सांस्कृतिक कार्ये व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वन विभागाला दिले आहेत.



जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण येथे नियोजित बिबट सफारीच्या अनुषंगाने मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी मंत्रालयात आज आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) डॉ. वाय. एल. पी. राव  यांच्यासह वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.




यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, जुन्नर आणि आसपासच्या तालुक्यात बिबट्यांची संख्या अधिक आहे. याठिकाणी बिबट सफारी प्रकल्प केला तर त्यामुळे स्थानिक भागात रोजगार आणि पर्यटनाच्या अधिकच्या संधी निर्माण होणार आहेत. याशिवाय, या परिसरात इतर अनेक पर्यटनस्थळेही आहेत. या प्रोजेक्टमुळे या पर्यटनक्षेत्रांकडेही पर्यटक आकर्षिले जाणार आहेत. त्यामुळेच बिबट सफारीच्या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करतांना या सर्व बाबींचा विचार केला जावा. बिबट सफारीचा प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा, यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार होताच तात्काळ निविदा प्रक्रिया राबवून कामांना सुरुवात करावी. विहित वेळेत कामे पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.



Prepare a detailed project report of Junnar Bibat Safari by 15 February


यावेळी माजी खासदार श्री. आढळराव व माजी आमदार श्री. सोनवणे यांनी, जुन्नर आणि आसपासच्या तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्वाचा असल्याचे सांगितले. 

गुरुवार, नोव्हेंबर २४, २०२२

खटकाळे तेथे शेतकरी बचत गटातील महिलांना भाजीपाला पिकांच्या बियाण्यांचे वाटप

खटकाळे तेथे शेतकरी बचत गटातील महिलांना भाजीपाला पिकांच्या बियाण्यांचे वाटप



जुन्नर : खटकाळे (ता.जुन्नर) येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग जुन्नर यांच्या आत्मा अंतर्गत पौष्टिक आहार योजनेअंतर्गत तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाठ व मंडळ कृषी अधिकारी दत्तात्रय जाधव व कृषी पर्यवेक्षक बापूसाहेब रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहायक अमोल मोरे यांनी महिला शेतकरी बचत गटातील महिलांना जवळजवळ दहा प्रकारचे भाजीपाला पिकांच्या बियाण्यांची वाटप करण्यात आले. Department of Agriculture Government of Maharashtra

तसेच एकात्मिक फलोत्पादन अभियान या योजनेची महिला शेतकरी बचत गट यांना माहिती देण्यात आली. त्यामुळे शेततळे अस्तरीकरण कांदा चाळ पॉलीहाऊस ग्रीन नेट याबद्दल माहिती देण्यात आली‌. तसेच परसबागेमुळे महिलांना महिलांना आपल्या परसबागेमध्ये भाजीपाला पिकांची लागवड करून घरच्या घरी ताजा व सेंद्रिय भाजीपाला उपलब्ध होणार आहे. या ताज्या भाजीपाल्यामुळे महिलांची रोजच्या आर्थिक खर्चात बचत होणार आहे.

यावेळी सरपंच शकुंतला मोरे, उपसरपंच भरत मोडक, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी मोरे तसेच शेतकरी मित्र विलास मोरे, शेतकरी बचत गटाच्या महिला अध्यक्ष लताबाई केदारी आणि गटातील सर्व शेतकरी महिला उपस्थित होत्या.

Distribution of seeds of vegetable crops to the women of farmers' self-help groups at Khatkala

शुक्रवार, ऑक्टोबर २१, २०२२

'एसएफआय'चे शाळा बंदी विरोधात पंचायत समितीसमोर आंदोलन

'एसएफआय'चे शाळा बंदी विरोधात पंचायत समितीसमोर आंदोलन

जुन्नर : 'एसएफआय' चे शाळा बंदी विरोधात पंचायत समितीसमोर आंदोलन

जुन्नर/आनंद कांबळे
: स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने शाळा बंद करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात जुन्नर पंचायत समिती कार्यालयासमोर "शाळा वाचवा आंदोलन" करण्यात आले.

यावेळी २० पटसंंख्येपेक्षा कमी शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करा, शिक्षण आमच्या हक्काचे, सर्वांना शिक्षण मिळालेच पाहिजे, आदी घोषणा देत पंचायत समिती परिसर दणाणून सोडला होता.

यावेळी बोलतांना एसएफआय चे जिल्हा सचिव नवनाथ मोरे म्हणाले, राज्य सरकार हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या समायोजनाच्या नावाखाली शाळा बंद करण्याचे धोरण राबवत आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील 1054 शाळांचा समावेश आहे. यामुळे बहुसंख्य विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार असून मोठ्या संख्येने मुली शिक्षणाच्या बाहेर फेकली जाणार आहेत. भारतीय संविधानाने 1 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना दिलेला मुलभूत शिक्षणाचा अधिकार पायदळी तुडविण्याचा सरकार प्रयत्न करतात आहे. त्यामुळे सरकारने निर्णय मागे घ्यावे.

तसेच किसान सभेचे जिल्हा सचिव विश्वनाथ निगळे म्हणाले, शाळा बंद करणारे धोरण हे विद्यार्थ्यांना शिक्षण नाकारणारे आहे, अशा परिस्थितीत स्थानिक लोकप्रतिनिधींनी याविरोधात आवाज उठविणे गरजेचे आहे. परंतु ते एकामेकांचवर टिका टिप्पणी करण्यात आणि पक्ष प्रवेश करण्यात मश्गूल आहेत. त्यामुळे त्यांना जनतेच्या प्रश्नांचे काही घेणे नाही, त्यामुळे जनतेने योग्य वेळी त्यांची जागा दाखविली पाहिजे.

तसेच डीवायएफआय चे गणपत घोडे म्हणाले, तालुक्यातील 84 शाळांवर टांगती तलवार असताना आपण विद्यार्थ्यांचे शिक्षण वाचविण्यासाठी एकत्र येत आहे. परंतु सर्व विद्यार्थी पालकांना एकत्र करून शिक्षणाचा मूलभूत अधिकाराच्या रक्षणासाठी सर्वांना एकत्र येणे गरजेचे आहे.

यावेळी पांगरी तर्फे मढ, चिल्हेवाडी, कवटेवाडी, सितेवाडी, हडसर, उच्छिल, कालदरे, आंबे या गावातील ग्रामपंचायती ठराव, शालेय व्यवस्थापन समितीचे ठराव घेण्यात आले.

यावेळी एस.एफ.आय चे राज्य समिती सदस्य राजेंद्र शेळके, जिल्हा सचिव नवनाथ मोरे ,जिल्हा सहसचिव प्रविण गवारी, जिल्हा उपाध्यक्ष रुपाली खमसे, तालुका सचिव अक्षय घोडे , डी.वाय.एफ.आय. चे तालुका सचिव गणपत घोडे, किसान सभा चे जिल्हा सचिव विश्वनाथ निगळे, किसान सभा तालुका सचिव लक्ष्मण जोशी, ज्ञानेश्वर गवारी, मंगल सांगडे, दिलीप मिलखे, शितल भवारी, सुदामा लांडे आदींसह शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Protest against 'SFI' school ban in front of Panchayat Samiti

शनिवार, सप्टेंबर १७, २०२२

 दिशाभूल व खोटी माहिती दिल्याप्रकरणी गुन्हा |

दिशाभूल व खोटी माहिती दिल्याप्रकरणी गुन्हा |



जुन्नर /आनंद कांबळे 

११२ नंबरला फोन करून दिशाभूल करणारी व खोटी माहिती दिल्या प्रकरणी जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये एका विरुद्ध कलम १७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली.

घडलेली हकीगत सविस्तर अशी की पोलीस खात्याने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व तात्काळ मदत उपलब्ध होण्याच्या हेतून ११२ हा नंबर जारी केला असून आपत्कालीन स्थितीत अथवा संकटाच्या वेळी हा नंबर डायल केला असता सदर व्यक्तीला तातडीने मदत उपलब्ध होते दरम्यान आज जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये ९५५२९७६८८५ या मोबाईल क्रमांकावरून एका अज्ञात इसमाने मी घोगरेवाडी, सुराळे ता जुन्नर येथील रहिवासी असून आमच्या इथे खूप सारे लोक नदीत वाहून गेले असून त्यात माझा भाऊ देखील आहे व आम्हाला मदत हवी आहे अशा आशयाचा फोन केला. बाब गंभीर असल्याने पोलीस अधिकारी व कर्मचारी तात्काळ मदतीसाठी रवाना झाले मात्र सदर ठिकाणी जाऊन  स्थानिक नागरिक व पोलीस पाटील यांना  घटनेची माहिती विचारली असता ही बाब खोटी असून अशी कोणतीही घटना या ठिकाणी घडलेली नाही अशी माहिती प्राप्त झाली.

त्यामुळे सदर इसमाने ११२ क्रमांकावर खोटा व दिशाभूल करणारा फोन केल्याचे सिद्ध झाल्याने त्या व्यतिविरोधात जुन्नर पोलीस ठाण्यात कलम १७७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Misleading and false information by calling 112 number