जुन्नर /आनंद कांबळे
११२ नंबरला फोन करून दिशाभूल करणारी व खोटी माहिती दिल्या प्रकरणी जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये एका विरुद्ध कलम १७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली.
घडलेली हकीगत सविस्तर अशी की पोलीस खात्याने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व तात्काळ मदत उपलब्ध होण्याच्या हेतून ११२ हा नंबर जारी केला असून आपत्कालीन स्थितीत अथवा संकटाच्या वेळी हा नंबर डायल केला असता सदर व्यक्तीला तातडीने मदत उपलब्ध होते दरम्यान आज जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये ९५५२९७६८८५ या मोबाईल क्रमांकावरून एका अज्ञात इसमाने मी घोगरेवाडी, सुराळे ता जुन्नर येथील रहिवासी असून आमच्या इथे खूप सारे लोक नदीत वाहून गेले असून त्यात माझा भाऊ देखील आहे व आम्हाला मदत हवी आहे अशा आशयाचा फोन केला. बाब गंभीर असल्याने पोलीस अधिकारी व कर्मचारी तात्काळ मदतीसाठी रवाना झाले मात्र सदर ठिकाणी जाऊन स्थानिक नागरिक व पोलीस पाटील यांना घटनेची माहिती विचारली असता ही बाब खोटी असून अशी कोणतीही घटना या ठिकाणी घडलेली नाही अशी माहिती प्राप्त झाली.
त्यामुळे सदर इसमाने ११२ क्रमांकावर खोटा व दिशाभूल करणारा फोन केल्याचे सिद्ध झाल्याने त्या व्यतिविरोधात जुन्नर पोलीस ठाण्यात कलम १७७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Misleading and false information by calling 112 number