Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मार्च २४, २०१९

'झिरो मॅरेज'ला सूर्योदय साहित्य पुरस्कार

 

नागपूर/प्रतिनिधी

सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ ,जळगावच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणारे सूर्योदय साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी दिली. सूर्योदय काव्यसरिता पुरस्कार शहरातील प्रा. दीपमाला कुबडे यांच्या ह्यआयुष्याच्या या वळणावर या काव्यसंग्रहाला आणि वर्षा किडे- कुळकर्णी यांच्या ' झिरो मॅरेज' या कथा संग्रहाला कथा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
गझल पुरस्कार शहादा नंदुरबारच्या हेमलता पाटील यांच्या 'असेलही नसेलही' या गझलसंग्रहाला जाहीर करण्यात आला आहे. नाशिकच्या अलका कुलकर्णी यांच्या 'देवचाफ्यावरचं चांदणं ' या कथा संग्रहासही कथा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शिरपूरच्या मोहनदास भामरे यांच्या 'मावळतीचे रंग' या कथासंग्रहास दलुभाऊ जैन कथा पुरस्कार, धुळेच्या संजय धनगव्हाळ यांच्या 'वळण' या कथासंग्रहास गिरीजा कीर कथा पुरस्कार, जळगावच्या दीपक तांबोळी यांच्या ' कथा माणुसकीच्या' या कथासंग्रहास सूर्योदय कथार% पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. नाशिकच्या संतोष हुदलीकर यांच्या ' फंटूस गाणी ' या बालकाव्यसंग्रहास आणि चंद्रपूरच्या विद्याधर बन्सोड यांच्या ' चिऊ ' या काव्यसंग्रहाला वि.भा. नेमाडे स्मरणार्थ विभावना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. परभणीच्या केशव वसेकर यांच्या ' रानवारा ' या काव्यसंग्रहाला सूर्योदय बाल साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मूर्तीजापूरच्या रवींद्र जमादे यांच्या ' दिवेलागण' या ललित लेखसंग्रहास साहित्य रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. नाशिकच्या संजय वाघ यांच्या 'जोकर बनला किंगमेकर' या बालकादंबरीस तर औरंगाबादच्या डॉ. विशाल तायडे यांच्या 'छोट्या राजूची मोठी गोष्ट ' या बालकादंबरीसही पुरस्कार जाहीर करण्यात आला. नाशिकच्या संजय चौधरी यांच्या ' कविताच माझी कबर' या काव्यसंग्रहाला काव्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शिरपूरच्या प्रा. डॉ. फुला बागुल यांच्या 'खारं आलनं ' या अहिराणी साहित्य समीक्षा या पुस्तकाला अक्षररत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दलुभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित सूर्योदय कथा पुरस्कार धरणगावच्या डॉ. संजीवकुमार सोनवणे यांच्या ' गाव कुठे आहे? ' या कथासंग्रहास जाहीर करण्यात आला आहे. मुंबईच्या रमेश सावंत यांच्या जंगलगाथा या काव्यसंग्रहाला तर दोंडाईचा येथील कवयित्री लतिका चौधरी यांच्या चंद्राचा रथ या बालकाव्यसंग्रहास जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार प्रदान सोहळा ऑगस्टमध्ये होणार्‍या पंधराव्या राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनात जळगावी होणार आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.