Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मार्च २४, २०१९

पुणे-काजीपेठदरम्यान २० विशेष गाड्या

नागपूर/प्रतिनिधी:
Image result for रेल्वे
उन्हाळ्यात वाढणारी प्रवाशांची संख्या लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने पुणे- काजीपेठ तसेच यशवंतपूर- निजामुद्दीन या मार्गांवर विशेष गाड्या सुरू केल्या आहेत.

या गाड्यांचे वेळापत्रक असे राहील- ०२१५१ पुणे- काजीपेठ- ही साप्ताहक विशेष गाडी १३ मेपर्यंत प्रत्येक सोमवारी पुण्यावरून २१.३० वाजता निघेल व मंगळवारी १८.३० वाजता काजीपेठ येथे पोहोचेल. मार्गातील स्थानकांवर या गाडीच्या आगमन- प्रस्थान वेळा अशा राहतील- धामणगाव दुसऱ्या दिवशी (१०.५५, १०.५७) पुलगाव (११.१२, ११.१४), वर्धा (११.३७, ११.४०), वरोरा (१२.३५, १२.३६), चंद्रपूर (१३.२२, १३.२५), बल्लारशा (१४.१५, १४.२०).

०२१५२ काजीपेठ -पुणे- ही साप्ताहिक गाडी १६ मेपर्यंत दर गुरुवारी काजीपेठवरून १३.३० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी ११.४५ वाजता पुणे येथे पोहोचेल. नागपूर विभागातील स्थानकांवर या गाडीच्या आगमन- प्रस्थान वेळा अशा- बल्लारशा (१७.२५, १७.३५), चंद्रपूर (१७.५०, १७.५३), वरोरा (१८.२९, १८.३०), वर्धा (२०.००, २०.०३), पुलगाव (२०.२५, २०.२७), धामणगाव (२०.४२, २०.४५).

या गाडीला एकूण २० कोच आहेत. यात एक द्वितीय वातानुकूलित, पाच तृतीय वातानुकूलित, चार साधारण व दोन एसएलआर कोच आहेत.

यशवंतपुर-निजामुद्दीन
यशवंतपूर- निजामुद्दीन- यशवंतपूरदरम्यान सहा विशेष गाड्या सोडण्यात येतील. ०६५२१ यशवंतपूर - निजामुद्दीन- साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी २८ मार्च रोजी गुरुवारी यशवंतपूरवरून सकाळी ६.३० वाजता सुटेल व शुक्रवारी सकाळी ५.४० वाजता हजरत निजामुद्दीन येथे पोहोचेल. ही गाडी शुक्रवारी बल्लारशा (१०२०, १०.२५), चंद्रपूर (१०.४४, १०.४५), नागपूर (१३.३०, १३,३५) येथे पोहचेल.

०६५२२ निजामुद्दीन- यशवंतपूर- ही साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी २५ एप्रिल तसेच १ एप्रिल रोजी सोमवारी हजरत निजामुद्दीनवरून रात्री २०.०० वाजता सुटेसल व तिसऱ्या दिवशी बुधवारी १५.०० वाजता यशवंतपूर येथे पोहचेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी मंगळवारी नागपूर (११.०५, ११.१०), चंद्रपूर (१३५९, १४.००), बल्लारशा (१५.००, १५.०१ ) येथे पोहचेल.

या गाडीला १४ कोच आहेत. यात एक द्वितीय वातानुकूलित, तीन तृतीय वातानुकूलित, सहा स्लीपर कोच, दोन साधारण व दोन एसएलआर कोचचा समावेश आहे. प्रवाशांनी या विशेष गाड्यांचा लाभ घेण्याचे आवाहन मध्ये रेल्वेच्या नागपूर विभागाने केले आहे.
(सेवा:मटा)

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.