Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मार्च २४, २०१९

आता सुट्टीच्या दिवशीही भरता येणार वीजबिल

नागपूर/प्रतिनिधी: 

मार्च महिना अखेर वीज ग्राहकांची देयकाची रक्कम भरतेवेळी गैरसोय होऊ नये म्हणून सार्वजनिक सुटीच्या दिवशी वीज देयके स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी नागपूर जिल्ह्यात ७६ ठिकाणी तर वर्धा जिल्ह्यात १७ ठिकाणी वीज देयके स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

२३ मार्च रोजी चौथा शनिवार आणि २४ मार्च रोजी रविवार असल्याने शासकीय कार्यालयांना सार्वजनिक सुटी राहणार आहे. पण मार्च अखेर असल्याने या दोन्ही दिवशी वीज देयके स्वीरकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील वीज ग्राहकांसाठी वरील दिवसांसह ३१ मार्च रोजी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत वीज देयकाची रक्कम स्वीकारल्या जाणार आहे.

महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक उपविभागात किमान एक असे एकूण १८ ठिकाणी वीज देयक स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सोबतच ग्रामीण भागात कार्यरत असणाऱ्या सहकारी पतसंस्थेच्या ५६ कार्यालयात या काळात वीज देयके स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी आणि हिंगणघाट विभागात प्रत्येकी ५, वर्धा विभागात ७ असे एकूण १७ वीज देयक स्वीकारणा केन्द्र सुरु राहणार आहे.

 वीज ग्राहकांना वरील पर्यायासोबतच महावितरण मोबाईल अॅप, ऑनलाइन पद्धतीने वीज देयकाचा भरणा करणे, नेट बँकिंगचा वापर करणे, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पैसे भरण्याचा पर्याय महावितरणकडून देण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात वीज ग्राहक याचा वापर करीत असल्याने सुटीच्या काळात वीज ग्राहकांनी या पर्यायाचा वापर करूनदेखील देयकाची रक्कम भरण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.