नाविन्यपूर्ण योजनेसाठी ऑनलाइन अर्जाची मागणी
चंद्रपूर/प्रतिनिधी:
नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय योजनेअंतर्गत 2019-20 या वर्षासाठी दुधाळ गाई व म्हशीचे गट वाटप, शेळी व मेंढी गट वाटप, मांसल कुक्कुट पक्षी संगोपन याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अंतिम मुदत 8 ऑगस्ट आहे. तरी इच्छुक नागरिकांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.
नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत सर्वसाधारण, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील 18 वर्षावरील अर्जदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना दुधाळ गाई व म्हशीचे गट वाटप करणे, शेळी व मेंढी गट वाटप करणे, मांसल कुक्कुट पक्षी संगोपन करणे इत्यादी उपक्रम राबवण्यात येणार आहे. तरी इच्छुक अर्जदारांनी https:/ah.mahabms.com या संकेत स्थळावर ऑनलाइन अर्ज करावेत.
अर्जदाराची प्राथमिक निवड ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या माहितीनुसार संगणकाद्वारे करण्यात येणार आहे. अंतिम निवड ही अर्जदाराने अपलोड केलेल्या कागदपत्रांच्या आधारे करण्यात येईल. याची अर्जदारांनी नोंद घ्यावी. या योजनेच्या अधिक माहिती करिता तालुकास्तरावरील पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा आणि 8 ऑगस्ट पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांचेमार्फत करण्यात आले आहे.