Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मार्च २४, २०१९

देशातील अव्वल दर्जाची सैनिकी शाळा चंद्रपूरमध्ये

चंद्रपूर/प्रतिनिधी:
Image result for सैनिकी शाळा
देशातील अव्वल दर्जाची सैनिकी शाळा चंद्रपूरमध्ये उभी राहिली आहे. एकूण १२३ एकरच्या विस्तीर्ण परिसरात निर्माण झालेली शाळा देशातील २९वी तर विदर्भातील पहिलीच सैनिकी शाळा असणार आहे, अशी माहिती टीम लीडर तसेच कॅम्पस कमांडर ब्रिगेडीअर सुनील गावपांडे यांनी दिली.
बल्लारपूर मार्गावर हिरव्यागार परिसरात सैनिकी शाळेची वास्तू पूर्णत्वास आली आहे. सध्या या ठिकाणच्या पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण झाली असून दुसरा व तिसरा टप्पा पूर्णत्वाकडे येत आहे. या शाळेचे मागीलवर्षी १ जुलैला भूमिपूजन झाले होते. येत्या १ जून रोजी ती सुरू होणार आहे. देशात अस्तित्वात असणाऱ्या सर्व सैनिकी शाळांपैकी सर्वांत अद्ययावत अशी ही इमारत व्हावी, यासाठी शासनाने प्रयत्न केले आहेत. ४८८ कोटींच्या या शाळेत इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण दिले जाणार आहे. या सैनिकी शाळेमध्ये भारतातील अद्ययावत असे सैनिकी संग्रहालय, शॉपिंग कॉम्प्लेक्स, जलतरण तलाव, वसतिगृह, फायर स्टेशन, हॉकी, फूटबॉल, टेनिससाठी स्वतंत्र कोर्ट यासारख्या सुविधा विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. 
विशाखापट्टणम, अमृतसर, महु या ठिकाणी असलेल्या सैनिकी संग्रहालयापेक्षा अधिक उत्तम संग्रहालय इथे होणार आहे. ताडोबामध्ये पर्यटनाला येणाऱ्या नागरिकांसाठी या शाळेला भेट देणे एक पर्वणी ठरणार असून पर्यटकांना सैनिकी शाळेच्या दर्शनी भागामध्ये भेट देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यटकांना दर्शनी भागांमध्ये देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शहीद वीरांच्या इतिहासाला दर्शविण्यासाठी पुतळे देखील उभे राहत आहेत. रणगाडे, विमान, हेलिकॉप्टर या सर्व लढाऊ साहित्याच्या प्रतिकृती याठिकाणी दर्शनी भागात ठेवण्यात येणार आहे. या ठिकाणी तयार होणारे मैदान ऑलिम्पिक दर्जाचे आहे. यावेळी लेफ्टनंट कर्नल महेश देशपांडे आदी उपस्थित होते.
अशी असेल प्रवेश परीक्षा
सैनिकी शाळेत इयत्ता सहावीपासून प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी तीनशे गुणांची प्रवेश परीक्षा राहणार आहे. यामध्ये गणित, इंग्रजी, सामान्य ज्ञान यावर वस्तुनिष्ठ स्वरुपाचे प्रश्न राहणार आहेत. एकूण ९० विद्यार्थ्यांची प्रवेशक्षमता असलेल्या शाळेची परीक्षा २१ एप्रिल रोजी होणार आहे. शाळेचे संपूर्ण संचालन रक्षा मंत्रालय करणार आहे. या शाळेमुळे विदर्भाचा सैन्यातील टक्का वाढण्यास मदत होणार आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.