Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मार्च २४, २०१९

अशोक चव्हाण राजीनामा देण्याच्या तयारीत..!

नागपूर/प्रतिनिधी:
धानोरकर यांच्या उमेदवारीसाठी अशोक चव्हाण आग्रही
 लोकसभा उमेदवारीवरून तापले काँग्रेसमधील राजकारण
Lok Sabha Election 2019: Fights in 33 of the 48 Lok Sabha constituencies in Maharashtra! | महाराष्ट्राच्या ४८ पैकी ३३ लोकसभा मतदारसंघांतील लढती ठरल्या!

चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या कॉंग्रेस उमेदवारीवरून कॉंग्रेस पक्षामध्येच चांगलेच राजकारण तापले असून कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे यांना लोकसभेची उमेदवारी घोषित केल्याने आमदार धानोरकर यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असलेले कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व कॉंग्रेसचे काही आमदार हे आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून याप्रकारची आडीओ क्लिप सध्या सोशल मोडीयावर वायरल होत आहे.

कॉंग्रेस तर्फे लोकसभा लढविण्यासाठी वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर हे इच्छुक होते व कॉंग्रेस मधीलच काही नेत्यांनी त्यांचे नाव पक्षश्रेष्ठींकडे सुचवले होते.काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजीचा नेहमी भाजपला फायदा झाला आहे. त्यामुळे पक्षाबाहेरील सर्वसहमती होऊ शकेल आणि अहीर यांच्याविरोधात सक्षम ठरेल अशा उमेदवारास लोकसभेचे तिकीट द्यावे अशे हायकमाण्डने ठरवले.

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे चंद्रपूरमधून शिवसेनेचा राजीनामा दिलेले बाळू धानोकर यांच्यासाठी आग्रही देखील होते. मात्र बाळू धानोरकर यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर ते निवडून आल्यास जिल्ह्यातील राजकारणात आपल्या भवितव्यावर गदा निर्माण होऊन आगामी काळात बाळू धानोरकर यांचे वाढलेले राजकीय वजन आपल्याला परवडणारे नाही, हे लक्षात आल्यानंतर कॉंग्रेसमधील काही नेत्यांनी बाळू धानोरकर यांच्या उमेदवारीचा आग्रह सोडला. चंद्रपूरमधून विशाल मुत्तेमवार किंवा बाळू धानोरकर या नंतर शुक्रवारी उशिरा काँग्रेसने विनायक बांगडे यांना उमेदवारी जाहीर केली,अचानकपणे जाहीर झालेल्या या यादित विनायक बांगडेचे नाव ऐकून अनेकांना धक्काच बसला.

विशाल मुत्तेमवार यांचे नाव निश्चित झाल्याची वार्ता एका प्रतिष्ठित न्यूज चैनलकडून समोर आल्यानंतर विशाल मुत्तेमवार हे नागपुरचे असल्याने चंद्रपुरात त्यांना उमेदवारी नको, अशी सामान्य काँग्रेसजनांनी मागणी लावून धरली आणि शेवटी विशाल मुत्तेमवार यांच्या नावावर पुनर्विचार चालू असला तरी बाळू धानोरकर यांना उमेदवारी मिळू द्यायची नाही, यासाठी काही काँग्रेस नेत्यांनी कंबर कसली आहे.

पक्षाने घोषित केलेला उमेदवार विनायक बांगडे हे सक्षम नसल्याचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी वणी तालुका कॉंग्रेस समितीने प्रदेश कॉंग्रेस समितीकडे केली होती. पण, प्रदेश आणि केंद्रीय समितीने विनायक बांगडे यांना उमेदवारी जाहीर केल्याने धानोरकर यांचे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी एकत्र येऊन चंद्रपूरच्या उमेदवारीत आर्थिक व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप केला.
सामूहिक राजीनामे!
भाजपचे उमेदवार हंसराज अहीर यांना केवल बाळू  धानोरकर पराभूत करू शकतात, असा विश्वास कार्यकर्त्याना आहे. त्यामुल्ठे त्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर कार्यकर्ते संतप्त झाले. वणी, मारेगाव आणि पांढरकवडा येथील काही नाराज कार्यकर्त्यानी पक्ष कार्याल्याचे कुलूप तोड़न पक्षाचे फलक पाडले. आर्णी, पांढरकवडा, घाटंजी, मरेगाव व वणी तालुका काँग्रेस कमिटीने सामूहिक राजीनामे दिल्याची माहिती आहे. रविवारी जिल्हातील काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येत राजीनामे देतील, अशी अपेक्षा आहे.

धानोरकर स्वतंत्र रिंगणात
आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतरही काँग्रेसची उमेदवारी हातून गेली. त्यामुत्ठे बाळू  धानोरकर यांनी आता अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची तयारी चालविली आहे. ते उद्या दिल्‍लीतून परतल्यानंतर यासंदर्भात
कार्यकर्त्याशी चर्चा करून पुढची दिशा ठरविणार आहेत.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर व्हायरल झाल्याने काँग्रेस पक्षाच्या गोटात खळबळ उडाली आहे. 'माझे पक्षात कुणी ऐकत नाही ..., मीही राजीनाम्याच्या विचारात आहे', अशा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे बोलतांना म्हणाले.चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून काँग्रेस पक्षात मतभेद असून, याबाबत आपले मत उघड करणाऱ्या एका काँग्रेस कार्यकर्त्याशी बोलताना चव्हाण यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.