Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, एप्रिल ०९, २०१९

एकच बोला “दूध” की “दारू”

  • श्रमिक एल्गारच्या पारोमिता गोस्वामीच्या एंट्रीने बदलले राजकीय समीकरण 

चंद्रपूर /प्रतिनिधी 

लोकसभा निवडणूक रंगात आली असतांना अचानक “दूध” व “दारू”हा चर्चेचा विषय होऊ घातल्याने मतदार स्तंभित झाल्याचे चित्र बघावयास मिळाले.प्रसार माध्यमातून दुधावाला विरूद्ध दारूवाला असेच चित्र उभे केल्याने आणखी घोटाळा झाला. कुणी दुधवाल्याची तर कुणी दारूवाल्याची पाठराखण करायला पुढे येत आहे.पाठराखन करणारे कदाचित हे विसरले की चंद़पूर जिल्ह्यात भेसळ दुध व नकली दारू विक्री सर्रास सुरू आहे.मग या दोघांना दारूवाला व दुधवाला असले बिरूद लावून नाहक चर्चा घडवून आणण्यात येत आहे व अयोग्य कार्यपध्दतीद्वारा या चर्चेतून मतदारांना भटकवण्याचाच प्रकार सुरू करण्यात आला असल्याचे स्पष्ट दिसते आहे.

विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढविण्याचा आव आणायचा व नेमके मतदारांना विकासाच्या मुद्यापासून लांब ठेवून वाह्यात चर्चा पुढे रेटण्याचा हा प्रकार लोकशाहीचा गळा घोटणाराच म्हणता येईल.

हंसराज अहिर केंद्रीय राज्य मंत्री राहिले आहेत.दुधवाला भैया हे बिरूद त्यांनाही खटकेल,भलेही ते दुध विकणाऱ्या गवळी समाजातील आहेत.कारण आजकाल दुधाचा धंदा प्रामाणिकपणाचा कुठे राहिला? बाळू भाऊ धानोरकरांना सुद्धा दारूवाला हे बिरूद जिव्हारी लागणारे आहेच.आ.विजय वडेट्टीवार यांनी धानोरकरांचा परवाना २० वर्ष आधिचा हे सांगून पाठराखण केली मात्र आजच्या घडीला जिल्ह्यात दारूवाला म्हणजे अवैध दारू विक्री करणारा असाच आहे.

कुठलाही रोगी डॉक्टरची जात अथवा त्याची नैतिक पार्श्वभूमी बघत नसतो.बघितले जाते त्याचे कौशल्य.नेमके आधुनिक काळात उमेदवार कुठल्या जातीचा,धर्माचा किंवा किती काळ पांढर करणारा याहीपेक्षा तो विकास मुद्दावर किती प्रामाणिक हे बघणे आवश्यक आहे.धानोरकर अथवा अहिर यांनी निवडणूक नामांकन भरताना जी प्रॉपर्टी दाखविली ती आली कुठून यावर मात्र चिंतन करण्याची कुणालाच गरज वाटत नाही .तसेच दारू किंवा दुध हा आता चिंतनाचा विषय नाही असे जाणकार बोलताना दिसतात.

यापेक्षा गत १५ वर्षात अहिर साहेबांनी काय केले व खासदार बणल्यावर धानोरकर विश्वासावर उतरणार का? यावर वादविवाद घडविणे आवश्यक आहे.कदाचित निवडणूक लढविणारे इतरही उमेदवार प्रामाणिक व सक्षम असू शकतात.काॉग़ेस व भा.ज.पा. ची मक्तेदारी थोडीच आहे.

चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात विशीष्ट जातीचे गट पाडून त्याना हडडी,मडडीची खुराक सुरू आहे?. चालणारे चलाख आहेत.खाणाऱ्यांची गिनती मात्र मुर्खात करण्यात आली आहे. कारण निव्वळ जातीच्या आधारावर उमेदवार निवडून येत नाही हा इतिहास आहे. अहिर, पुगलिया,श्रीमती फडणवीस,वडेट्टीवार, मुनगंटीवार हे कधिच जातीच्या समिकरणातून निवडून आले नाहीत.

जातीच्या आधारावर उमेदवार निवडून आले नाहीत तर मग दुध व दारुचे गणित मतदारांना भटकवण्याचाच प्रकार नाही का? पारोमिता गोस्वामीनी दारू वाल्याचे विरोधात प्रचार करण्याचा संकल्प सोडला आहे. दारूबंदीतिल त्यांचे योगदान बघता संकल्प योग्य आहे. मात्र संयुक्तिक वाटत नाही.कारण अवैध दारू विक्री रोखण्यात हंसराज अहिरानी तरी कुठे तेवढा आटापिटा केला आहे?

नवी पिढी “ग्रिन टी” पिणारी व दारूचा तिटकारा करणारी आहे.ईथे दुध व दारू ऐवजी रोजगार,चांगले शिक्षण,हमीभाव,कमी महागाई हवी आहे.या लोकसभा निवडणुकीत दुधाकडे,दारू कडे बघून मतदारांना आवाहन करण्याऐवजी पुढील पाच वर्षांत काय हवे हे समजावून मतदारांना खरे “अर्थपुर्ण”आवाहन आवश्यक आहे.व ही राजकीय पक्षांची जबाबदारी आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.