Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, एप्रिल ०९, २०१९

आयुक्तांनी केली महाकाली यात्रा व्यवस्थेची पाहणी


चंद्रपूर, दि ९ एप्रिल : शहरात दरवर्षी चैत्र पोर्णिमेला चंद्रपूरची आराध्य दैवता माता महाकालीच्या ऐतिहासीक महाकाली मंदिर परिसरात भव्य यात्रा भरते. यंदा महाकालीच्या यात्रेला ११ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. अनेक वर्षांची परंपरा लाभलेल्या या यात्रेची राज्यभरातील भाविक आतूरतेने वाट पाहत असतात. अखेर प्रतीक्षा संपून ही यात्रा सुरू होत असल्याने राज्याच्या विविध भागातून भाविक चंद्रपुरात दाखल होणे सुरू आहे.

सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. मनपा प्रशासनाचे अधिकतर कर्मचारी निवडणूक कार्यात व्यस्त आहेत. असे असले तरी मनपा प्रशासनाने या यात्रेसाठी जय्यत तयारी केली आहे तसेच या यात्रेकडे व भाविकांच्या सुविधांकडे लक्ष ठेवून आहे.

या दृष्टीने चंद्रपूर शहर महानगपालिका आयुक्त संजय काकडे यांनी सकाळी 10 वाजता यात्रा परिसरातील कामकाजाची पहाणी केली. येणार्या वाहनामूळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून झरपट बंधारा, बैलबाजार भाग, गौतमनगर सुलभ शौचालय व शासकीय अध्यापक विद्यालय जवळील जागांची पार्किंग संबंधी व्यवस्थेबाबत पाहणी केली व आवश्यक सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. महानगपालिका प्रशासनातर्फ़े झरपट पात्रातील इकोर्निया वनस्पती काढून पात्र स्वच्छ करण्यात आलेले आहे, बैलबाजार भागात पटांगणाची पूर्णतः सफाई करण्यात आली असून याच भागात भक्तांकरिता मांडव टाकण्याचे काम सुरू झालेले आहे, झरपट बंधाऱ्याच्या रंगरंगोटीचे कार्यही लवकरच सुरू होत आहे. सुमारे महिनाभर चालणाऱ्या या उत्सवा दरम्यान नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.

याप्रसंगी सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, शहर अभियंता महेश बारई, शाखा अभियंता हजारे, स्वच्छता निरीक्षक विवेक पोतनूरवार, भुपेश गोठे उपस्थित होते,

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.