Chandrapur Lok Sabha by Elections: Khabarbat special report news
चंद्रपूरच्या पोटनिवडणुकीचा इतिहास जाणून घेऊया !
लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक लागायला अवघा एक वर्ष बाकी आहे. इतका कमी अवधी बाकी असताना चंद्रपूर लोकसभेचे विद्यमान खासदार बाळू धानोरकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे आता चंद्रपुरात पोटनिवडणुकीची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी प्रशासकीय हालचाली सुरू झाल्यात आणि राजकीय पक्षांनी देखील उमेदवार ठरवण्यासाठी आता चाचपणी सुरू केली आहे.
स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या कालखंडामध्ये चंद्रपूर लोकसभेमध्ये ही दुसऱ्यांदा पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. यापूर्वी एक पोटनिवडणूक झाली होती, असा इतिहास आहे. 1962 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत चंद्रपूर लोकसभेतून काँग्रेसचे एडवोकेट स्वामी यांचा पराभव झाला. आणि त्यांच्या जागी आदिवासी सेवा समितीचे उमेदवार राजे लालशाम शहा हे निवडून आलेत. मात्र त्यांनी अवघ्या तीन वर्षांमध्येच म्हणजेच 1965 मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने गोपिकाताई कन्नमवार याना उमेदवारी दिली.
राज्याचे तेव्हाचे मुख्यमंत्री स्वर्गीय मारोतराव कन्नमवार यांच्या त्या पत्नी. त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढली आणि ही लोकसभा जिंकली होती. चंद्रपूर लोकसभेकरिता आजवर 1952 पासून 18 वेळा निवडणुका झाल्या आहेत. यामध्ये काँग्रेसने 11 भाजपने चार आदिवासी सेवक समितीचा एक उमेदवार आणि नाग विदर्भ आंदोलन समितीच्या दोन वेळा खासदार निवडून आले आहेत. यातील बहुतेक खासदारांना आपल्या पदाचा कार्यकाळ पाच वर्षे पूर्ण करता आला. मात्र काही कारणास्तव लोकसभा विसर्जित झाल्याने काहींना पूर्ण कार्यकाळ करता आला नाही. चंद्रपूर लोकसभेमध्ये आतापर्यंत राजे विश्वेश्वरराव महाराज, शांताराम पोटदुखे, हंसराज अहिर, नरेश पुगलिया आणि आता बाळू धानोरकर यांच्या रूपाने खासदार प्राप्त झाला होता. मात्र बाळू धानोरकरांच्या दुखद निर्णयामुळे आता पुन्हा एकदा पोट निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत.
चंद्रपूर बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर चंद्रपूरची जागा रिक्त झाली आहे. आता या जागेवर निवडणूक होणार काय? असा प्रश्न मतदार विचारत आहे. आता या जागेची निवडणूक पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसोबत होणार की दोन्ही निवडणुका स्वतंत्रपणे होणार, हे येत्या काळात लवकरच कळेल. ( 2023 elections in India)
महिनाभरापूर्वी खासदार गिरीश बापट आणि त्यांच्यापाठोपाठ ३० मे रोजी चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचे अकाली निधन झाले. त्यांच्या निधनाने लोकसभेच्या या दोन जागा रिक्त झाल्या. भाजपसह काँग्रेसनेही या निवडणुकांची तयारी सुरु केली. पण वर्षभरावर आलेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका होऊ नयेत, अशी अनेकांची इच्छा आहे. ( Loksabha Election)
सध्याच्या लोकसभेचे मुदत 16 जून 2024 ला संपते. म्हणजे एका वर्षाच्या आसपास या लोकसभेचा कालावधी बाकी आहे. लोकसभा किंवा विधानसभेची जागा सदस्याच्या मृत्यू किंवा इतर कारणांना रिक्त झाल्यास सहा महिन्यांमध्ये निवडणूक घेण्याची लोकप्रतिनिधी कायद्यामध्ये तरतूद आहे. लोकसभा किंवा विधानसभेचे मुदत संपण्यास एक वर्षापेक्षा कमी कालावधी असल्यास पोटनिवडणूक घेणे बंधनकारक नाही तसेच केंद्र सरकार सोबतच्या सल्ला मसलती मध्ये पुढील सहा महिन्यांमध्ये पोटनिवडणूक घेणे शक्य नाही, हे निवडणूक आयोगाला पटल्यास पोटनिवडणूक होत नाही. (Khabarbat special report news)
नैसर्गिक आपत्ती कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न रोगराई अशा कारणाने पोटनिवडणूक पुढे ढकलले जाऊ शकते. कोरोना काळामध्ये अशी परिस्थिती उद्भवली होती. पुण्यातील लोकसभेची जागा 29 मार्चला रिक्त झाली होती. या जागेसाठी येत्या सहा महिन्यांमध्ये म्हणजेच 29 सप्टेंबर पर्यंत निवडणूक होणं आवश्यक आहे. ही जागा रिक्त होऊन दोन महिने उलटलेत दुसरीकडे चंद्रपूरची जागा 30 मेला रिक्त झाली आहे. या दोन्ही ठिकाणी एक वर्षापेक्षा जास्त कालावधी शिल्लक असल्याने नियमानुसार निवडणूक घेता येऊ शकते. पण जूनमध्ये पावसाळा सुरू होईल. पावसाळा किंवा सणासुदीच्या काळामध्ये शक्यतो निवडणुका होत नाहीत. त्यामुळे ही निवडणूक होणार की नाही. (Khabarbat special report news)
कर्नाटकातील लोकसभेच्या तीन जागा 21 मे 2018 ला रिक्त झाल्या होत्या. त्यावेळी लोकसभेची मुदत तीन जून 2019 ला संपत होती. एक वर्ष आणि बारा दिवसांचा उद्या असताना निवडणूक आयोगानं पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्याचवेळी आंध्र प्रदेशातील पाच जागा 20 जून 2018 ला रिक्त झाल्या. एक वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक असल्याचं कारण देत निवडणूक आयोगाने आंध्रातील पोटनिवडणुका मात्र टाळल्या. महाराष्ट्रातील उदाहरण आहे भाजपचे त्यावेळचे आमदार आशिष देशमुख यांनी ऑक्टोबर 2018 मध्ये आमदारकीचा राजीनामा दिला. ऑक्टोबर 2019 मध्ये विधानसभेची निवडणूक होणार होती. त्यामुळे या जागेसाठी पोटनिवडणूक घेऊ नये अशी सर्व पक्षांची मागणी होती. मात्र निवडणूक आयोगाने एप्रिल 2019 मध्ये या जागेसाठी निवडणूक घेण्याचा निर्णय जाहीर केला. (Khabarbat special report news)