Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, एप्रिल ०५, २०२०

लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांना धान्य वाटपाचे आदेश...



शालेय मध्यान्न भोजन योजना...



राजुरा-  कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात चौदा एप्रिल पर्यंत लाकडाऊन करण्यात आलेले आहे. राज्यात संचार बंदीही सुरू आहे. घराबाहेर निघू नका.घरातच सुरक्षित रहा. असे सक्तीचे आदेशही सर्वांना देण्यात आले आहे. मात्र शिक्षण विभागातील निघालेल्या परिपत्रकानुसार शालेय मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत शिल्लक असलेले अन्नधान्य वाटप करण्याबाबतचा सक्तीचे आदेश सर्व शाळांना धडकलेले आहेत. त्यामुळे संचार बंदीत बाहेर निघायचे कसे असा प्रश्न शिक्षकांसमोर पडलेला आहे.




देशात कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी कडक पावले उचलण्यात आलेली आहेत. राज्यात विषाणू संसर्ग टाळण्यासाठी 31 मार्चपर्यंत शाळांना सुट्ट्या देण्यात आलेल्या होत्या .त्यानंतर देश लाकडावून झाल्यामुळे 14 एप्रिल पर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले .याच सुट्ट्यांच्या कालावधीत शिक्षण विभागाने मध्यान्न भोजन योजनेअंतर्गत शिल्लक असलेले अन्नधान्य कडधान्य डाळी याचे वाटप करण्याचे आदेश शाळांना प्राप्त झाले आहेत. यामुळे मुख्याध्यापक व शिक्षकांसमोर द्विधा मनस्थिती आहे . संचारबंदी सुरू असल्यामुळे बाहेर निघू नये असे सक्तीचे आदेश आहेत. अशातच एक ते आठ वर्गापर्यंत असणाऱ्या शाळांमध्ये शालेय मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत शिल्लक असलेले अन्नधान्य कडधान्य व डाळी यांचे वितरण करण्याचे सक्तीचे आदेश आले आहेत.धान्य वितरीत करतांना शक्यतोवर विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलवण्याचे सूचना आहेत. शिवाय पालकांना धान्य वाटप करताना सोशल डिस्टन्स राखण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. नियमाचे पालन न करणाऱ्या मुख्याध्यापकांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत. यामुळे पालकांशी संपर्क साधून त्यांना शाळेत बोलावून अन्नधान्याचे वितरण करणे शाळांना बंधनकारक झालेले आहे.एकीकडे संचार बंदी आणि दुसरीकडे अन्नधान्य वाटप करण्याचे शिक्षण विभागाचे पत्र यामुळे मुख्याध्यापक संभ्रमात आहेत.



शालेय मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत शिल्लक असलेला अन्नधान्यसाठा गरीब विद्यार्थ्यांच्या पालकांना देण्याबाबतचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत. त्या अनुषंगाने शिक्षण विभागाचे पत्र आहे. सर्व शाळांना याबाबत सूचित करण्यात आलेले आहे. अन्नधान्याचे वाटप करत असताना कोरोणा संसर्ग पसरू नये याची दक्षता घेणेबाबतच्या स्पष्ट सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आलेल्या आहेत.
- विजय परचाके.
गट शिक्षणाधिकारी, राजुरा


एकीकडे संचार बंदी आहे. बाहेर निघण्यास कुठलीही अधिकृत परवानगी दिलेली नाही. दुसरीकडे कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गावबंदी करण्यात आलेले अनेक गावे आहेत. अशा स्थितीत मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी अनधान्य वाटप कसे करावे याबाबत संभ्रम आहे. बाहेर पोलिसी कारवाई झाल्यास शिक्षकांनी काय जबाब द्यावा. शिवाय अन्यधान्य वाटप करताना सूचनेनुसार विद्यार्थ्यी किंवा पालकांची गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वरिष्ठ अधिकारी याबाबत स्पष्ट सांगायला तयार नाहीत. सुरक्षेच्या दृष्टीने लाकडाऊन नंतर धान्य वितरित करायला पाहिजे होते.
 संजय चिडे , तालुकाध्यक्ष, महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती राजुरा.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.