क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या वादात अल्पवयीन मुलाने एकाच्या डोक्यावर बॅटने वार करीत त्याची हत्या केली, 4 दिवसांनी हे प्रकरण चंद्रपूर पोलीस स्टेशनमध्ये गेल्याने याबाबत पोलिसांचा तपास सुरू झाला आहे.
शहरातील बगडखिडकी परिसरात काही मुले क्रिकेट खेळण्यात व्यस्त होते, खेळ म्हटला की वादावादी होणारचं, मात्र या वादात एक खुनी संघर्ष घडला.
खेळण्यावरून दोन गटात वाद झाला आणि वादाचे रूपांतर हाणामारीत झाले, यामध्ये एका अल्पवयीन मुलाने दुसऱ्या अल्पवयीन मुलाच्या डोक्यावर बॅट ने वार केला, तो मुलगा अचानक झालेल्या वाराने जमिनीवर कोसळला, त्याला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले
मात्र दुसऱ्या दिवशी उपचार सुरू असताना त्या मुलाचा मृत्यू झाला.
Chandrapur Maharashtra Crime News today Live News