Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जून ०६, २०२३

प्रविणभाऊ आडेपवार माध्यमिक विद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम Pravinbhau Adepwar School

प्रीतम नवघडे विद्यालयातून प्रथम



निफन्द्रा- अष्टविनायक बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली द्वारा संचालित प्रवीण भाऊ आडे पवार माध्यमिक विद्यालय निफंद्रा येथील एसएससी मार्च 2023 परीक्षेचा निकाल 95 टक्के लागला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा निकालाची परंपरा कायम राखली.या परीक्षेला 20 विद्यार्थी प्रविष्ट झाले त्यापैकी 19 विद्यार्थी पास झाले.

यात प्राविण्य श्रेणीत -09,
प्रथम श्रेणीत -07
व्दितीयश्रेणीत-03

विद्यालयातून 83.60%गुण घेत प्रीतम प्रशांत नवघडे -प्रथम,कुमारी रिया महेंद्र ढोलने 82.60% गुण घेत
व्दितीय -लिनाशा रमेश अलाम 82.60% गुण घेत अनुक्रमे व्दितीय तर 81.80% गुण घेत धीरज युवराज घुबडे तृतीय आला.
उत्तीर्ण विद्यार्थांचे शाळेचे संस्थापक विजय आडेपवार संस्थेचे अध्यक्ष गजानन येनगंदलवार ,सचिव रवींद्र आडेपवार, सर्व संचालक मंडळ ,मुख्याध्यापक रविंद्र कुडकावार,गुरुजन व शिक्षक पालक संघ,शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.