चंद्रपूर नागपूर मार्गावर विना परमिट धावणाऱ्या ट्रॅव्हल्स वर आज आरटीओ आणि वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 10 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत तर 17 गाड्यांना मेमो देण्यात आला आहे.
चंद्रपूर नागपूर मार्गावर मोठ्या प्रमाणावर खाजगी ट्रॅव्हल्स चालतात मात्र हे ट्रॅव्हल्स विना परवानगी ने चालत असल्याची माहिती आरटीओ आणि वाहतुक शाखेला मिळाली त्यानुसार आज डी.एन.आर, पर्पल, रॉयल,महालक्ष्मी, रामायण अश्या विविध खासगी बसेसवर RTO विभागामार्फत कारवाई करण्यात आली असून तब्बल 10 गाड्या जमा करण्यात आल्या तसेच 17 गाड्यांना मेमो दिल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वमभर शिंदे यांनी दिली आहे.
वीना परवाणा चालणाऱ्या या ट्रॅव्हल गाड्या सामान्य प्रवाशांसाठी धोकादायक असून या बाबत RTO विभागाला अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.सोबतच सध्या सुट्यांचा सीजन सुरु तसेच उन देखील जास्त असल्याने या वातानुकुलीत खाजगी ट्रॅव्हल्स मध्ये बसण्यासाठी प्रवासी चांगलीच गर्दी करत आहे व काही खाजगी ट्रॅव्हल्स क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवत असल्याची देखील तक्रार परिवहन विभागली होती.या तक्रारींच्या आधारावरच ही कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
---------------------------------------------------------------------------------
जाहिरातीसाठी राखीव
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:९१७५९३७९२५ या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध)