Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मार्च १०, २०२३

या कारणामुळे चंद्रपूर शहरातील पोस्ट ऑफिस 10 दिवसांपासून बंद; नागरिकांची मोठी गैरसोय | Postoffice Chandrapur Maharashtra

चंद्रपूर शहरातील पोस्ट ऑफिस 10 दिवसांपासून बंद; नागरिकांची मोठी गैरसोय

स्थानिक भानापेठ उपपोस्ट ऑफिसमधील सर्व्हर 10 दिवसांपासून कार्यरत नसल्यामुळे पोस्ट ऑफिसमधील कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

या कारणामुळे चंद्रपूर शहरातील पोस्ट ऑफिस 10 दिवसांपासून बंद; नागरिकांची मोठी गैरसोय | Postoffice Chandrapur Maharashtra

शहरातील भानापेठ येथील सबपोस्ट ऑफिसमध्ये 10 दिवसांपासून म्हणजेच 27 फेब्रुवारीपासून लिंक बिघडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पोस्ट कर्मचाऱ्यांनी सांगितले की, सर्व्हर 10 दिवसांपासून काम करत नाही. त्यामुळे कोणतेही काम होत नाही. लवकरच लिंक दुरुस्त करून काम सुरळीत केले जाईल. पुढील चार-पाच दिवस तरी कामकाज सुरळीत होणार नाही असे शक्यता कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. चंद्रपूर शहरातील महत्त्वाचे पोस्ट ऑफिसमध्ये हा तांत्रिक बिघाड झाल्याने कामकाज ठप्प पडले. येथील नागरिकांना आता मुख्य पोस्ट कार्यालयात म्हणजेच प्रियदर्शनी चौकातील पोस्टात जावे लागत आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन तेथील सुद्धा कामकाजावर मोठा परिणाम होत आहे.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.