नागपूर:अरूण कराळे:
तालुक्यातील खडगाव ग्रामपंचायत व मिशन इंडिया चर्च यांच्या संयुक्त सहकार्याने गावातील गरीब मजूर व कामगारांना धान्य व किराणाचे वाटप करण्यात आले. कोरोना विषाणूमुळे संचारबंदी असून मजूराच्या हाताला काम नसल्यामुळे आर्थीक अडचण निर्माण झाल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे .
ती उपासमारीची वेळ टाळण्यासाठी माजी सरपंच देवराव कडू व मिशन इंडिया चर्च चे प्रमुख डॉ. रेजि लुकास यांच्या अथक प्रयत्नाने मजूर वर्गाला मोफत धान्य व किराणाचे वाटप करण्यात आले . यावेळी सरपंच रेखा मून ,उपसरपंच किशोर सरोदे ,सचिव सुनील जोशी ,शिबु चाको , मोनि लुकास , शितल उईके,सरला कडु, संघमित्रा गव्हांदे, वंदना महल्ले, रेणूका गोमकार, ज्योती ठाकरे, संगीता खुसपरे , मनोज कडु , चंद्रशेखर गणवीर, गोपाल ताकीत ,गणेश रहांगडाले उपस्थित होते.