गरजवंतांची उपासमार होऊ नये म्हणून पालकमंत्र्याचा आधार
चंद्रपूर/प्रतींनिधी:
कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर देशासह राज्यात जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वत्र कडकडीत बंद आहे. अशावेळी गरजवंत, कष्टकऱ्यांची उपासमार होऊ नये म्हणून ब्रम्हपुरीनंतर सावली व सिंदेवाहीतील गरजू, शेतमजूर, कष्टकरी, गरीब कुटुंबाना १५ दिवस पुरेल एव्हडे अन्न धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून रविवारी तहसिल कार्यालय सावली व सिंदेवाहीच्या परिसरात शुभारंभ करण्यात आले.
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कडून ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातर्गत सावली व सिंदेवाही तालुक्यातील गरजवंताना मोफत जीवनावश्यक वस्तूं वाटपाच्या शुभारंभ प्रसंगी सावली येथे विलास यासलवर नगराध्यक्ष नगरपंचायत, विजय कोरेवर सभापती पंचायत समिती, दिनेश चिटनूरवार, राजू सिद्धम सरपंच, श्रीमती कुमरे तहसीलदार, ठाणेदार बाळासाहेब खाडे, मंजुषा वाजळे मुख्याधिकारी तसेच सिंदेवाही येथे आशाताई गंडाते नगराध्यक्ष नगरपंचायत, रमाकांत लोंढे सदस्य जिल्हा परिषद, स्वप्नील कावळे, नरेंद्र भैसरे, अरुण कोलते, सिमताई साखरे, राहुल पोरेड्डीवार, विरेंद्र जैस्वाल उपस्थित होते. तर यावेळी दिव्या संघपाल दुधे, मालू बंडू मेदपल्लीवार, मीनाक्षी राऊत, शालू मेदपल्लीवार यांच्यासह 30 तर सिंदेवाही येथे जयप्रकाश बबन शेंडे, रोशनी चारसिंग ताक, शिफा स्लिम सुरेश, सुरेश पस्तंवार यांच्यासह 30 लाभार्थ्यांना अन्न धान्य किटचे वाटप करण्यात आले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनाअंतर्गत गेले काही दिवस जिल्ह्यात संचारबंदी असल्यामुळे मजुरांच्या हाताला काम नाही, लहान व्यवसाय करणारे कारागीर व दुकानदार यांचा रोजगार बंद झाल्यामुळे त्यांना घरीच बसून राहावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या मुलाबाळांची उपासमार होऊ नये, त्यांना पोटभर अन्न ऊपलब्ध व्हावे तसेच ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाहीत अशाही गरजू लोकांना पोटभर अन्न मिळावे म्हणून पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील निराश्रितांना, गरजवंताना, विधवा,अपंग, भूमिहीन,मजूर यांच्या कुटुंबांना किमान 15 दिवस पुरेल एवढया जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात येत आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावापासून देश वाचवण्यासाठी शासनाने संपूर्ण देशात लॉकडाऊन केले. संपुर्ण लॉकडाउन मूळे वाहतूक थांबली ,कामधंदे मिळणे थांबले, जीवनावश्यक वस्तूची दुकाने वगळता देशभरात इतर सर्व दुकाने बंद आहेत. एकुणच हातावर पोट असणाऱ्या आणि गोर- गरीब जनतेवर याचा पर्यायाने प्रतिकूल परिणाम होत आहे. मग ज्याचे हातावर पोट आहे ! त्यांचे काय? त्यांच्या घरात चूल कशी पेटणार अशा परिस्थीतीत त्यांची उपासमार होऊ नये या उदात्त हेतूने पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मार्फत ब्रम्हपुरी नंतरआज सावली आणि सिंदेवाहीत आज(रविवारी) प्रती कुटूंब १० किलो तांदूळ, २ किलो तूर डाळ, १ किलो खाद्य तेल, २०० ग्राम मिरची पावडर, ५० ग्राम हळद पावडर, १ किलो मीठ, १ साबण या जीवनावश्यक वास्तूचे किट मोफत वाटप करण्यात आले. वाटप करताना शासनाने लावलेल्या कलम १४४ चे पालन करण्यात आले.
एरव्ही कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.अशापरीस्थितीत गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून लोकांना खऱ्या अर्थाने आधार देण्याचे काम पालकमंत्री श्री. विजय वडेट्टीवार करत आहेत.
निराश्रितांची कदापि उपासमार होऊ देणार नाही
लॉकडाउन मुळे जिल्ह्यातील स्थलांतरित कामगार, गरजवंत, हातावर पोट असणाऱयांची उपासमार होऊ नये म्हणून मोफत अन्न धान्य वाटपाचा उपक्रम सुरु केला आहे. नजरचुकीने कोणी राहिले असेल ज्यांना धान्य पॉकेट मिळालं नाही त्यांनी संपर्क साधा जिल्ह्यातील कुणाचीही उपासमार होऊ देणार नाही! विजय वडेट्टीवार, पालकमंत्री,