Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जुलै ३१, २०२३

अत्याधुनिक शस्त्रे कोणी पुरविली? ट्रायबल फोरम ने प्रश्न केला उपस्थित Tribal Forum

मणिपूर राज्यातील 'त्या' नराधमांना फासावर लटकवा!

ट्रायबल फोरम : राष्ट्रपती राजवटही लागू करा | पंतप्रधानांकडे मागणी




मणिपूर राज्यात दोन महिलांना भररस्त्यात नग्न करुन धिंड काढत सामुहिक बलात्कार करणाऱ्या 'त्या' नराधमांना फासावर लटकवा.आणि तेथे राष्ट्रपती राजवट लागू करा. अशी मागणी ट्रायबल फोरमने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेकडे केली आहे.
या संदर्भात तहसिलदार यांचे मार्फत निवेदन पाठविण्यात आले आहे.

मणिपूरमध्ये जमावाने कुकी जमातीच्या दोन महीलांची भररस्त्यात नग्न धिंड काढून त्यांच्यावर सामुहिक बलात्कार केल्याच्या घटनेचा ट्रायबल फोरम,ट्रायबल युथ फोरमच्या वतीने जाहीर निषेध नोंदविला आहे.

मणिपूर राज्यात ४ मे २०२३ रोजी कुकी जमातीच्या दोन महिलांना काही नराधमांनी घेरले.त्यांनी त्या महीलांना विवस्त्र करुन त्यांची भररस्त्यात नग्न धिंड काढली.त्यानंतर त्यांना शेतात नेऊन त्यांच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आला.

मन हेलावून टाकणारी घटना घडली असून जगातील मानवतेला या घटनेने काळीमा फासला आहे.सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशात असे घ्रुणास्पद क्रुत्य लांछनास्पद आहे. संविधानाच्या अधिकाराचं जाहीरपणे उल्लंघन होत आहे.

गत मे महिण्यापासून मणिपूर राज्यात सातत्याने कुकी या आदिवासी समाजावर अनन्वित अन्याय, अत्याचार,जाळपोळ,जातीय हिंसा,सामुहिक बलात्कार होत आहे.तरी सुद्धा केंद्र सरकारने पाहणी करण्यासाठी पथके पाठवली नाहीत. वांशिक संघर्ष थांबविण्यासाठी कठोर भूमिका घेतलेली नाही.असा आरोप करण्यात आला आहे.

या देशातील मूळनिवासी असलेला आदिवासी समाज आजही आपल्याच मायभूमीत सुरक्षित नसल्याचे वास्तव चित्र अधोरेखित झाले आहे.

मणिपूर मधील राज्यसरकारने कठोर पावले न उचलल्यामुळे परिस्थिती चिघळली आहे.त्यामुळे सरकार बरखास्त करुन तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी.

यावेळी ट्रायबल फोरमचे जिल्हाध्यक्ष नितीन तडवी,ट्रायबल युथ फोरम जिल्हाध्यक्ष रणजित वसावे,ट्रायबल फोरम तालुकाध्यक्ष सिमादादा तडवी,तुषार नाईक,प्रभू तडवी,हरिश्चंद्र तडवी तानसिंग वळवी,दिपक वळवी,जिग्नेश पाडवी,जितेंद्र पाडवी विजय वळवी आदी उपस्थित होते.

*अत्याधुनिक शस्त्रे कोणी पुरविली?*

मणिपूर राज्यात मैतेई युवा संघटना, मैतेई लिपून,कांगलेईपाक कनबा लुप,अरामबाई तेंगगोल,विश्व मैतेई परिषद या संघटनांच्या ८०० ते १००० कार्यकर्त्यांना अत्याधुनिक शस्त्रे कोणी पुरविली ? याचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी. आणि या संघटनांवर बंदी आणावी.

*कोट*
देशात एकीकडे बेटी बचाव,बेटी पढाओ चा नारा,महिला सक्षमीकरण तर दुसरीकडे महिलांवर अत्याचार किती विसंगत परिस्थिती. महिलांवरील घ्रुणास्पद अत्याचार सहन केल्या जाणार नाहीत. नराधमांना फासावर लटकवा आणि राष्ट्रपती राजवट लागू करा.
- नितीन तडवी जिल्हाध्यक्ष
ट्रायबल फोरम नंदुरबार.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.