मनोजदादा घोरपडे यांचे आश्वासन
मायणी - ता.खटाव जि.सातारा (सतीश डोंगरे)
खटाव माण साखर कारखान्याच्या पहिल्या १000 साखरेच्या पोत्यांचे पुजन कारखान्याचे को. चेअरमन मनोजदादा घोरपडे, कारखान्याचे चेअरमन आमदार प्रभाकर घार्गे, एम. डी. संग्राम घोरपडे मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी कारखान्याचे को . चेअरमन मनोजदादा घोरपडे यांनी ऊसाची पहिली उचल २५00 रू देणार असल्याचे जाहीर केले. काल खटाव माण साखर कारखान्यावर संचालक मंडळाची बैठक पार पडली व त्यानंतर साखर पोत्यांचे पुजन करण्यात आले . यावेळी बोलत असताना कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे म्हणाले चालु वर्षी ऊसाचे गाळप चांगल्या पदधतीने चालू झाले असून, गळीत हंगामावरोवर १२ मेगावॅट विज निर्मीती चालु केली आहे.
पुढील हंगामात पहिल्या दिवसापासुन ४५00 मेटिक टनाने गाळप करणार आहे व॒ ४५७0 चा डिसलरी प्रोजेक्ट कार्यान्वित करणार असुन जास्तीत जास्त उत्पादनाचे सोर्स कारखाण्यात तयार करणार आहे.
यावेळी बोलताना मा . मनोजदादा घोरपडे म्हणाले, खटाव माण साखर कारखाना हा शेतक-यांचा हक्काचा कारखाना असुन कराड उत्तरच्या शेतकयांच्या ऊसासाठी होणारी पिळवणुक लक्षात घेऊन कारखान्याची उभारणी केली असुन ऊसाला पहिली उचल २५00 रू . देणार असल्याचे आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करत असल्याचे सांगीतले उर्वरीत रक्कम जिल्हयातील इतर कारखान्यांच्या वरोवरीने दर देणार आहे. यावेळी चेअरमन माजी आमदार प्रभाकर घार्गे म्हणाले सदर कारखाना संपूर्ण अँटो असल्याने चालू २०१८ -२०१९ चा गळीत हंगाम चांगल्या पदधतीने चालु झाला असून आज साखर पुजन प्रसंगी अतिशय समाधान होत आहे, असे समाधान कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी कर्मचारी तसेच सर्व सभासद यांना मिळवण्यासाठी कटीबद्ध राहणार असुन शेतक यांनी जास्तीत जास्त ऊस पुरवठा करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.