कॅनलजवळील दारे पाहत असताना आ. डॉ. दिलीपराव येळगावकर व इतर मान्यवर.
टेम्भू कॅनलजवळ दारे बसवले
मायणी ःता. खटाव जि.सातारा
ब्रिटिश कालीन तलावात आता भिकवडीजवळून जाणार्या टेंभू कँनाँलमधून लवकरच पाणी मिळणार आहे. कालच(३-३-२०१९)या टेंभू कँनाँलजवळील जागेचे पूजन करण्यात आले व ठिकाणी पाणी पुरवठा करण्यासाठीचे दारे मान्यवरांच्या उपस्थितीत बसविण्यात आले. यावेळी खटाव तालुक्याचे माजी आमदार व भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. दिलीपराव येळगावकर व मायणी ग्रामपंचायतचे उपसरपंच व सर्व ग्रा.पं.सदस्य व ग्रामस्थ तसेच महिला फार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. येळगावकर म्हणाले-मी दिलेला शब्द पाळतो. आज मला खूप आनंद होत आहे. टेंभूचे पाणी मायणीच्या धरणात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. थोड्याच कालावधीत टेंभूचे पाणी धरणात पोहोचणार आहे. मायणी व परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. याच धरणातील पाणी आसपासच्या गावांना पिण्यासाठी उपलब्ध होणार आहे. आजच आपण महिलांच्या हस्ते दार्याचे पूजन केले आहे. आता तरी विरोधकांनी कोल्हेकुई थांबवावी. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांनी कँनाँलजवळील दारे बसवलेले पाहून आनंद व्यक्त केला व मा.आ.डॉ. येळगावकर यांना धन्यवाद दिले.