Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, एप्रिल ०७, २०१९

शहांचा चंद्रपूर गडचिरोली दौरा रद्दचे कारण काय?

चंद्रपूर/प्रतिनिधी:

 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांची गडचिरोली आणि चंद्रपूर येथील सभा शेवटच्या क्षणी रद्द करण्यात आली आहे. अमित शाह यांची सभा रद्द होण्याचे कारण उशिरापर्यंत स्पष्ट झालेले नव्हते़.

गडचिरोलीमध्ये भाजपच्या बड्या नेत्याची ही पहिलीच सभा होती. कोणत्याही मोठ्या नेत्याने अजून गडचिरोलीमध्ये सभा घेतलेली नव्हती. पण भाजपने अमित शाह यांची सभा आयोजित केली होती, पण ऐनवेळी ही सभा रद्द करण्यात आली.अमित शाहंच्या सभेसाठी गडचिरोलीच्या आदिवासी भागतून लोकं आली होती. अखेर सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख भाषणानंतर ही सभा संपवण्यात आली. मात्र अमित शाह हे चंद्रपूरात न येऊ शकण्याच्या कारणावरून विरोधक मात्र सोशल मिडीयावर सभेला गर्दी न जमल्याने सभा रद्द झाली असल्याचे कारण सांगत आहेत,तर दुसरीकडे ऐन वेळी सभेचे स्टार प्रचारक सुधीर मुनगंटीवार यांना बनावे लागले आणि सभेची धुरा सांभाळावी लागली.


शाह यांचे रविवारी ओरिसात तीन कार्यक्रम झाले. तेथे नियोजनापेक्षा अधिक वेळ लागला. नागपूरला पोहचण्यास सायंकाळचे 6 वाजतील अशी स्थिती झाली. नंतर सूर्यास्तामुळे हेलिकॉप्टर वापरणे अशक्य असल्याने त्यांना चंद्रपूर, गडचिरोली सभांना जाता आले नाही अशी माहिती भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली.सायंकाळी ५ वाजतापासून चांदा क्लब ग्राऊंडवर कार्यकर्ते व नागरिक गोळा होऊ लागले. मात्र ऐनवेळी अमित शहा यांचा दौरा रद्द झाल्याची वार्ता सभास्थळी पोहचली.या सभेसाठी भक्कम जाहीरात देखील करण्यात आली होती,चंद्रपूर जिल्ह्यात माहोल देखील झाला होता,चंद्रपूर येथील चांदा क्लबवर सायंकाळच्या सुमारास भाजप समर्थकांची चांगलीच गर्दी देखील बघायला मिळाली,तर सोशल मिडीयावर भाजप समर्थांनी गर्दी शक्ती प्रदर्शानाचे फोटो अपलोड करीत कॉंग्रेसला टोमणे देखील मारले, गडचिरोली नक्षलग्रस्त भाग असल्यामुळे पोलिसांनी गडचिरोलीमध्ये चोख तयारी केली होती. सभेसाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.मात्र शेवटच्या क्षणी सभा रद्द झाल्यामुळे भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचा हिरमोड झाला. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.