Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, एप्रिल ०७, २०१९

मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग



मुंबई  : मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झालेल्या न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांना राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज पदाची शपथ दिली.
राजभवन येथे झालेल्या या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. शपथविधीनंतर राज्यपाल व मुख्‍यमंत्री यांनी न्यायमूर्ती श्री. नंदराजोग यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. राज्याचे मुख्य सचिव यू.पी.एस.मदान यांनी न्यायमूर्ती नंदराजोग यांच्या नियुक्तीच्या अधिसूचनेचे वाचन केले.
या सोहळ्यास मुंबई उपनगरचे पालकमंत्री तथा उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश मोहित शहा, राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, राज्याचे लोकायुक्त एम.एल.तहलियानी, राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष चंद्रशेखर ओक, मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे, राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी आदींसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या सोहळ्याचा प्रारंभ आणि समारोप राष्ट्रगीताने झाला.
न्यायमूर्ती श्री. नंदराजोग हे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून दिल्ली उच्च न्यायालयात कार्यरत होते. तसेच, 2017 मध्ये राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.