Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, एप्रिल ०७, २०१९

मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर

11 एप्रिलला होणार मतदान, राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याची वेळ

चंद्रपूर/प्रतीनिधी:
मतदान साठी इमेज परिणाम
लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य शासनाने मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. सदर सुट्टी कामासाठी आपल्या लोकसभा मतदार संघाच्या क्षेत्राबाहेर असतील अशा कर्मचाऱ्यांना लागू असेल. राज्य आणि केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम व इतर प्रतिष्ठान इत्यादींना लागू असल्याची माहिती जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यातर्फे देण्यात आली आहे. 

लोकसभा सार्वजनिक निवडणुकीकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील 70- राजूरा, 71- चंद्रपूर, 72- बल्लारपूर, 73- ब्रह्मपुरी, 74-चिमूर, 75-वरोरा या सहा विधानसभा मतदारसंघातील मतदार संघातील ऐकून 2131 मतदार केंद्रांवर गुरुवार दिनांक 11 एप्रिल रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान घेण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीत मतदान करता यावे याकरिता राज्य शासनाने मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. जिल्हयातील कामगार कामासाठी आपल्या लोकसभा मतदार संघाच्या क्षेत्राबाहेर असतील अशा कर्मचाऱ्यांना लागू असणार आहे. 

सदर सुट्टी चंद्रपूर जिल्हयातील राज्य आणि केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम तसेच अकृषी, कृषी आणि अन्य विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, शिक्षण संस्था उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, खाजगी कंपनी व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्न गृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम, माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इत्यादींना लागू राहील. 

अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी दोन ते तीन तासांची सवलत देता देण्यात यावी. मात्र त्याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी अथवा महानगरपालिका आयुक्त यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता आस्थापना मालकांनी घेणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या परिच्छेद 135 ब नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना मतदानाचा हक्क बजावत यावा यासाठी कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी लागू राहील . 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.