Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, एप्रिल ०७, २०१९

नांदगावात महिलेचा विहीरीत बुडून मृत्यू


जुनगाव-  प्रतिनिधी ।
मुल पोलीस ठाण्याअंतर्गत नांदगाव येथिल महिलेचा शेतातील विहीरीतील पाण्यात तोल गेल्याने बुडून मृत्यू झाला आहे.सविता राजु गिरडकर असे या दुर्दैवी महीलेचे नाव आहे. महिलेचा मृतदेह विहीरीतून बाहेर काढण्यात यश आले.
नांदगाव शेतशिवार परिसरात रविवारी दुपारी ही दुर्दैवी घटना घडली. शेतात लावलेल्या पालक,भिंडी ला पाणी देण्यासाठी सविता एकटीच शेतात गेली. शेतात असलेल्या विहीरीचे पाणी काढण्यासाठी गेली असता तीचा तोल जाउन विहीरीत बुडाली. पाणी काढत असताना तोल गेल्याने सविता पाण्यात पडल्या. यावेळी मदतीसाठी त्यांनी आरडाओरडा केला. माञ मदतकार्य पोहचेपर्यंत पाण्यात बुडून सविता वय ३८ यांची प्राणज्योत मालवली होती.माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विनोद अहीरकर, तसेच परिसरातील शेतक-यांनी घटना स्थळावर धाव घेतली.
मृतक सविताताई यांना दोन मुली आहेत. पती आणि मुली अत्यंत शोकमग्न असुन ओशाळ नजरेने घरात डोकाऊन पाहातृ आहेत.या घटनेने नांदगाव आणी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.