Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, एप्रिल ०७, २०१९

पुढील पाच वर्षात वडसा-गडचिरोली लोहमार्ग - मुनगंटीवार


गडचिरोली- पाच वर्षाच्या कार्यकाळात सरकारने जिल्'ाच्या विकासासाठी भरीव निधी दिला आहे. यंदाच्या निवडणुकीत पुन्हा अशोक नेते यांना निवडून दिल्यास पुढील पाच वर्षांत वडसा-गडचिरोली लोहमागार्चे काम पूर्ण करु, अशी ग्वाही वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे भाजप-सेना-रिपाइं युतीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ देवकुले पटांगणावर आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.

मुनगंटीवार पुढे म्हणाले, यापुढेही जनतेने भाजपच्या बाजूने कौल दिल्यास आमदार, खासदार व मंत्री जिल्'ाच्या विकासासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करतील. वडसा-गडचिरोली लोहमागार्साठी राज्य सरकारने आपला ५० टक्के वाटा दिला. त्यामुळे पुढच्या पाच वर्षात हा मार्ग पूर्ण होईल. वनजमिनीवर अतिक्रमण करुन शेती कसणा?्यांना पट्टे देण्यासाठी ३ पिढ्यांची अट ठेवण्यात आली आहे. यापुढे ही अट रद्द करण्याचा प्रयत्न सरकार करेल, तसेच ओबीसी समाजाच्या पाठीशी सरकार उभे राहील. बेरोजगारी दूर करण्यासाठी पाचशे कोटी रुपये देऊन संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभार्थींना मिळणा?्या रकमेत चारशे रुपयांची वाढ करु, असे आश्वासन मुनगंटीवार यांनी दिले.

याप्रसंगी अशोक नेते यांनी भाजप सरकारने ओबीसींचे आरक्षण १९ टक्के पूर्ववत केल्याचे सांगितले. वडसा-गडचिरोली रेल्वेमार्ग आपण मंजूर केला असून, आचारसंहिता संपल्यानंतर या लोहमागार्चे काम सुरु होणार असल्याचे सांगितले. आपल्या लोकसभा मतदारसंघात आपण प्रयत्न केल्याने १३ हजार कोटींचे राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाल्याचे सांगून नेते यांनी नागभिड-नागपूर ब्रॉडगेजसाठी निधी खेचून आणल्याचे सांगितले. सिंचनासाठी ५ बंधारे आपल्याच प्रयत्नाने मंजूर झाल्याचेही नेते यांनी सांगितले.

(हिंदुस्थान समाचार)

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.